राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ही दुसरी दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्यावतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारतात. यंदाच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट पडली आहे. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत साजरा होणार आहे.
बारामतीकरांनो,
सालाबादाप्रमाणे यंदाचा हा दिवाळी सण एकत्र येऊन आपण सगळे साजरा करूया..!
दीपावली पाडवानिमित्त काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी मी तुमचं स्वागतो करतो..!
दिवाळीच्या सणाचं महाराष्ट्रात राजकीय महत्व आहे. पाडव्याच्या दिवशी तर सभा अन् मेळाव्यांची रेलचेल असते. आता तर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे. यंदाही पाडव्याच्या दिवशी मेळावे आहेत. समारंभ आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेससाठी यंदाचा दिवाळी पाडवा वेगळाच आहे. यामागेही कारण आहे ते पक्षातील फुटीचं. त्यामुळे यंदा दिवाळीत शरद पवार आणि अजित पवार गटाचे असे दोन वेगळे मेळावे होणार आहेत.
भाजपकडून उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये पोहोचले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
अजित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट बरच बोलकं आहे. सालाबादप्रमाणे अशा शब्दाने दादांनी या ट्विटची सुरुवात केली आहे. यामागे काही राजकीय संदेश आहे याचा शोध घेतला जात आहे. पक्ष आणि चिन्हानंतर आता अजितदादांकडून दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमावरही दावा सांगितला जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “बारामतीकरांनो, सालाबादप्रमाणे यंदाचा हा दिवाळी सण एकत्र येऊन आपण सगळे साजरा करू या.. दीपावली पाडव्यानिमित्त काटेवाडी येथील माझ्या निवासस्थानी मी तुमचं स्वागत करतो.. चला, बंधूभाव जपूया..!”
अजित दादांच्या या ट्विटचा अर्थ काढला जात आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना शरद पवार यांच्या उपस्थितीत पाडवा साजरा व्हायचा. त्यानंतर दरवर्षी याच पद्धतीने पाडवा साजरा केला जात होता. परंतु, यंदा तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीत फूट पडली आहे. आमदारांचा एक मोठा वर्ग अजितदादांसोबत बाहेर पडला आहे. अजित पवारांचा गट सध्या सत्तेत आहे. त्यातच निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी स्वतंत्र अशा दिवाळी पाडवा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
राजकीय दिवाळीचा विषय निघाला की महाराष्ट्रात शरद पवारांच्या घरची दिवाळी. बारामतीमधील गोविंदबागेतील दिवाळी सर्वांनाच आठवते. दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करते. यंदा मात्र, येथेही पवार कुटुंबात फूट पडल्याचं आहे. पक्षात फूट पुडल्यानंतर अजित पवार गट वेगळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबातील व्यक्तींचं विभाजन झालं आहे. आता तर विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. त्यामुळे पवारांचा पाडवा हा सध्या राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय झाला आहे.