उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता राज्यात विधानसभेसाठी प्रचाराची सुरुवात झाली आहे. आपल्या स्टार प्रचारकांची यादी (Star Campaigner List) प्रत्येक पक्षाकडून जाहीर होत आहे. आपल्या 24 स्टार प्रचारकांची यादी ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह या यादीमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) , आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे 05 नोव्हेंबरपासून प्रचाराची सुरुवात करणार आहे तर 06 नोव्हेंबरला लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून 90 पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर काँग्रेसने 100 पेक्षा जास्त उमेदवार दिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे.
Uddhav Thackeray शिवसेना (ठाकरे गट) स्टार प्रचारकांची यादी
- उद्धव ठाकरे
- आदित्य ठाकरे
- संजय राऊत
- अरविंद सावंत
- भास्कर जाधव
- अनिल देसाई
- विनायक राऊत
- आदेश बांदेकर
- अंबादास दानवे
- नितीन बानुगडे पाटील
- प्रियांका चतुर्वेदी
- सचिन अहिर
- सुषमा अंधारे
- संजय (बंडू) जाधव
- किशोरी पेडणेकर
- ज्योती ठाकरे
- संजना घाडी
- जान्हवी सावंत
- शरद कोळी
- ओमराज निंबाळकर
- आनंद दुबे
- किरण माने
- प्रियांका जोशी
- लक्ष्मण वडले