7.3 C
New York

Raj Thackeray : ‘चिन्ह कष्टानं कमावलेलं, ढापून मिळवलेलं नाही’, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Published:

सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आता जोरदार प्रचाराची सुरुवात करण्यात येत आहे. यातच आज मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

आम्ही निवडणूक चिन्ह कष्टानं कमावलेलं. ते आम्ही ढापून मिळवलेलं नाही. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पराभव स्वीकारावा लागला असा खुलासा देखील यांनी या कार्यक्रमात बोलताना केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईमधील तीन जागांवर लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवली होती मात्र तीनपैकी फक्त एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला तर दोन जागेवर त्यांच्या पराभव झाला. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या पराभवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हट्ट कारणीभूत ठरला कारण मी त्यांना सांगत होतो दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईत तुमच्या हाती काहीही लागणार नाही, त्या जागा लढवू नका असं मी त्यांना अनेकदा सांगितलं मात्र त्यांनी त्या जागा हट्टापायी पदरात पाडून घेतले असं राज ठाकरे म्हणाले.

शिंदे आणि अजित पवार गटाकडून भाजपाचे 16 नेते शिंदे लढणार

राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता राज ठाकरे यांना त्यामुळे महायुतीकडून दोन जागा ऑफर करण्यात आले होते त्यापैकी एक जागा दक्षिण मुंबईची होती मात्र या जागेवर शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढा अशी अट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती त्यामुळे आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती देखील या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी दिली.

तुम्ही मला सांगताय, आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे पण रेल्वे इंजिन ही मी कमावलेली निशाणी आहे ढापलेली निशाणी नाही. आम्हाला इतक्या वर्षांच्या निवडणूक प्रवासानंतर ती निशाणी मिळाली आहे. आम्हाला ती निशाणी लोकांच्या मतदानातून मिळालेली आहे, ती कोर्टातून आलेली नाही. असं देखील राज ठाकरे यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे यांना म्हटले होते असेही राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img