13.8 C
New York

Air India : एअर इंडियाचे प्रवासी अडचणीत…डिसेंबरपर्यंत विमानांची उड्डाणे रद्द

Published:

एअर इंडियाचे (Air India) प्रवासी अडचणीत आले आहेत. कारण विमानाच्या कमतरतेमुळे भारत-अमेरिका (India-America Airplane) मार्गावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रद्द केलेली उड्डाणे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान चालणार होती. भारतातून अमेरिकेला जाणारे तब्बल 60 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आलीयं. एअर इंडियाचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अमेरिकेसाठी तब्बल 60 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलंय. यामध्ये फ्रान्सिको आणि शिकागोसाठीच्या विमानांच्याही उड्डाणाचा समावेश आहे.

विमानांचे उड्डाणे रद्द करण्यात आल्यानंतर एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फ्रान्सिको, वॉशिंग्टन, शिकागो, न्यूयॉर्कसाठी 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत तब्बल 60 उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. विमानांच्या मेंटेनन्ससह इतर समस्यांमुळे सेवा केंद्रांवरून काही विमाने परत येण्यास विलंब होत आहे. यामुळे ऑपरेशनल फ्लाईटमध्ये घट झाली आहे. आतापासून डिसेंबर अखेरपर्यंत काही उड्डाणे रद्द करण्यात आली असल्याचं एअर इंडियाकडून सांगण्यात आलंय.

राज ठाकरेंच्या भाकि‍तावर फडणवीसांचं मोठं विधान

एअर इंडियाला एमआरओच्या ऑपरेटरकडून विमाने वेळेत न मिळाल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच इतरही काही कारणांमुळे विमानांचं उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलंय. विमानांच्या अडचणींमुळे टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान भारत-अमेरिका मार्गावरील सुमारे 60 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. एअरलाइन्सच्या सुत्राच्या माहितीनूसार प्रवासाच्या काळात रद्द करण्यात आलेल्या फ्लाइट्समध्ये सॅन फ्रान्सिस्को आणि शिकागोच्या सेवांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img