राज्यात ईडी, सीबीआय या यंत्रणेच्या गैर वापराचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकदा केला. (Ajit Pawar) विरोधकांना त्रस्त करण्यासाठी या यंत्रणाचा वापर केल्याचा सातत्याने आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या नेत्यांवर आर्थिक घोटाळ्याचा, गैर व्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला. एकतर त्या मंडळींनी पक्षांतर केले अथवा त्यांनी सक्रीय राजकारणातून माघार घेतली. 2019 पासून आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणात केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, PMLA गुन्हे 132 खासदारांविरोधात दाखल करण्यात आले आहे. 43 इतका राज्यातील लोकप्रतिनिधींचा आकडा आहे. राज्यात ज्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार, घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. निवडणूक शपथपत्रातून त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे दिसून आले आहे.
नेत्यांचा निघाला घामटा
गेल्या दहा वर्षांपासून देशात अनेक ठिकाणी विरोधकांना ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खाते यांच्याकडून त्रास देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे. ज्या नेत्यांवर आरोप केला. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटात प्रवेश केल्यावर त्यांच्याविरोधातील प्रकरणं थंड बस्त्यात टाकल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. भाजपा हे वॉशिंग मशीन असल्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचार सभेत गाजवला होता. देशभरात अनेक ठिकाणी छापासत्र आणि धाडी घालण्यात आल्या. अनेक बड्या नेत्यांना त्यात तुरुंगाची हवा खावी लागली. पण विरोधकांचे हे आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावले आहेत. नेत्यांवरील चौकशी प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.
ईडीचा ससेमिरा, शपथपत्रानुसार कोट्यवधींची संपत्ती
राज्यातील काही नेत्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही शिलेदारांवर आर्थिक घोटाळ्याचे, गैरव्यवहाराचे अथवा फसवणुकीचे आरोप करत त्यांची चौकशी करण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र जोडले आहे. त्यात त्यांनी संपत्तीचा घोषवारा जोडला आहे.
अजित पवार यांची संपत्ती किती?
गेल्या पाच वर्षांत अजितदादांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात याविषयीचा घोषवारा दिला आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या स्थावर मालमत्तेत 10 कोटींची वाढ झाली आहे. 37 कोटी 15 लाख 70 हजार 29 हजारांची त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता 8 कोटी 22 लाख 60 हजार 680 रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. 95 कोटी 53 लाख 10 हजार 780 रुपये पती-पत्नीची एकत्रित मालमत्ता. त्यात एक किलो सोने, 35 किलो चांदीची भांडी, 20 किलो चांदीच्या भेटवस्तू आणि 21 किलो चांदीच्या मूर्तींचा समावेश आहे.
सीएमपदासाठी जनतेची एकनाथ शिदेंनाच सर्वाधिक पसंती, काय सांगतो सी वोटरचा सर्व्हे?
छगन भुजबळ यांच्या संपत्तीचा आकडा
तर 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची छगन भुजबळ यांच्याकडे एकूण मालमत्ता आहे. त्यांच्यावर 24 लाख 56 हजारांचे कर्ज आहे. भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमीन, दोन घरं आहेत. त्यांनी न्यायालयात 3 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम सोनं आहे. त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे. 11 कोटी 20 लाख 41 हजारांची भुजबळ यांच्याकडे मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर 16 कोटी 53 लाखांची मालमत्ता आहे. मागील पाच वर्षांत भुजबळ यांच्या मालमत्तेत 82 लाखांची भर पडली तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 3 कोटी 35 लाख रुपयांची भर पडली.
प्रताप सरनाईक यांची संपत्ती किती?
गेल्या 5 वर्षांत शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांच्या संपत्ती मोठी वाढ दिसून आली. या कालावधीत त्यांच्या संपत्तीत 100 कोटींपेक्षा अधिकची भर पडली आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यावेली त्यांची एकूण संपत्ती 143 कोटी 97 लाख 18 हजार 745 इतकी होती. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी 2024, एकूण संपत्ती 271 कोटी 18 लाख 39 हजार 647 रुपये इतकी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची आहे. म्हणजे त्यांच्या संपत्तीत 128 कोटी रुपयांची वाढ गेल्या पाच वर्षांत झाल्याचं दिसून येत आहे.