सिबील स्कोअर चांगला ठेवा असा (CIBIL Score) सल्ला आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नेहमीच दिला जातो. जर सिबिल स्कोअर लाल मार्कपर्यंत पोहोचला तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचा सिबील स्कोअर शून्य असेल तर त्याला कर्जासाठी अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? याची माहिती असणे गरजेचे आहे. जर सीबील स्कोअर शून्य असेल तर आर्थिक बाबतीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सीबील स्कोअर जर 300 पॉइंट असेल तर त्याला खराब श्रेणीत गणले जाते. अशा परिस्थितीत सीबील स्कोअर लवकरात लवकर चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
CIBIL Score काय होते नुकसान
जर तुमचा सिबील स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येतात. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्याआधी सीबील स्कोअर चेक करते. संबंधित व्यक्ती कर्ज परत करू शकण्यात समर्थ आहे किंवा नाही याचा अंदाज सीबील स्कोअर वरून घेतला जातो. जर स्कोअर खराब असतानाही जर बँकेने कर्ज दिले तर कर्जाची वसुली होईल (Bank Loan) की नाही याची काळजी बँकेला सतत लागलेली असते. त्यामुळे सीबील स्कोअर चांगला असेल तरच कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था संबंधित व्यक्तीला कर्ज देण्याचा विचार करू शकते.
CIBIL Score जास्त व्याज द्यावे लागेल
जर एखाद्या बँक किंवा वित्तीय संस्थेने सीबील स्कोअर खराब असतानाही कर्ज दिले तर या संस्था संबंधित कर्जदाराकडून जास्त व्याज (Loan Interest) वसूल करतात. बँकेला कर्जदार डीफॉल्ट होण्याचा धोका सतावत असतो. त्यामुळे रिस्क कमी करण्यासाठी बँक संबंधित कर्जादरांकडून जास्त व्याज वसूल करते.
सीबील स्कोअर खराब असण्याचा परिणाम इन्शुरन्सवर देखील पडतो. होय सीबील स्कोअर खराब असेल तर इन्शुरन्स कंपनी (Insurance) ग्राहकाकडून जास्त प्रीमियम घेते. अशा परिस्थितीत कंपनीला क्लेमचा (Insurance Premium) धोका सतावत असतो. त्यामुळे विमा कंपनी जास्त प्रीमियम घेते. काही विमा कंपन्या अशाही आहेत ज्या सीबील स्कोअर खराब असेल तर इन्शुरन्स देण्यास नकार देतात.
CIBIL Score कर्ज मिळण्यात अडचणी
सीबील स्कोअर खराब असेल तर पर्सनल लोन (Personal Loan) किंवा होम लोन मिळण्यात (Home Loan) अडचणी येतात. या दोन्ही कर्जात संबंधित कर्जदाराला जास्त व्याज द्यावे लागेल. यातच बँक कर्ज देताना काही वस्तू देखील गहाण ठेऊ शकते. सिबील स्कोअर शून्य असताना जर कर्जासाठी अर्ज केला असेल तर अशा वेळी लवकर कर्ज मिळत नाही. बँक किंवा वित्तीय संस्था सर्वात आधी संबंधित अर्जदाराच्या कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करेल. जर कर्ज देताना काही वस्तू गहाण ठेवण्याची वेळ आली असेल तर त्याचीही व्यवस्थित तपासणी बँकेकडून केली जाईल.