13.8 C
New York

Assembly Election : 4 नोव्हेंबर नंतर राज्यात प्रचाराचा धुरळा…

Published:

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक (Assembly Election) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची देखील मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता सर्वत्र प्रचारांची लगबग बघायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 5 नोव्हेंबरपासून प्रचार दौरे सुरू करणार आहेत. त्यांची पहिली सभा रत्नागिरी येथे होणार आहे.तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 6 नोव्हेंबर ला महाराष्ट्रात येत आहेत, नागपूर येथे सकाळी संविधान बचाओ रॅली आणि संध्याकाळी मुंबईत बी के सी मैदानात महाविकास आघाडी च्या घटक पक्षांची संयुक्त सभा होणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित असणार आहेत. .

तब्बेती च्या कारणास्तव सध्या फारसे बाहेर निघत नसलेले उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीत प्रचार दौरे करणार आहेत. सुरुवात कोकणातून करणार असून कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 17 नोव्हेंबर रोजी सांगता सभा ही मुंबई येथे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात 16 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा असणार आहे. यातील अनेक सभा या संयुक्त असणार आहेत. तसेच आदित्य ठाकरे, संजय राऊत व सुषमा अंधारे यांचे देखील सभा होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रात प्रचार सभाचा धुरळा उडवणार आहेत, पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात जवळपास 10 ते 15 सभा घेणार आहेत.भाजपकडून 100 हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभा पार पडणार आहेत.येत्या 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात असणार आहे. या काळात ते महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभा फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतल्या जाणार आहेत. या सर्व सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही महाराष्ट्रात 15 सभा होणार आहेत. तसेच गोवा, मध्यप्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री हे देखील महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

शिंदे आणि अजित पवार गटाकडून भाजपाचे 16 नेते शिंदे लढणार

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शाहांच्या होणार आहेत. अमित शाह हे महाराष्ट्रात 20 सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांत होणार आहेत.

Assembly Election कोणत्या नेत्यांच्या किती सभा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी – 8 अमित शाह – 20 नितीन गडकरी – 40 देवेंद्र फडणवीस – 50 चंद्रशेखर बावनकुळे – 40 योगी आदित्यनाथ – 15

देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे, मात्र महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतरलगेचचअसल्याने राजकीयपक्षांचेनेते प्रचारातचांगलेचगुंतलेआहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या 288 जागांसाठी तब्बल 7 हजार 995 उमेदवार मैदानात आहेत. त्यातच महायुती व महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळे बड्या नेत्यांपुढे बंडखोरांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या नेत्यांचा दिवाळीचा संपूर्ण सण बंडखोरांसोबत जोरबैठका काढण्यातच जाणार असल्याचे चित्र आहे.दिवाळी चा सण साजरा करण्याचे सोडून आता महायुती आणि महाविकास आघाडी चे नेते बंडखोरांना मनवण्याची रणनीती आखत आहेत, मुंबईत बोरिवली पश्चिम येथे भाजपा चे उमेदवार संजय उपाध्याय यांच्या विरोधात भाजपा चे बंडखोर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचे कडवे आव्हान आहे, त्यामुळे शेट्टी यांना मनवण्याचे भाजपा नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. .उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण शेट्टी यांची समजूत काढण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे

माहीम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत, त्यांना भाजपा ने पाठिंबा दिला असला तरी महायुती तील घटक पक्ष, शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज भरल्याने त्यांना मानवण्याचे महायुती मधील नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img