3.5 C
New York

Assembly Election : शिंदे आणि अजित पवार गटाकडून भाजपाचे 16 नेते शिंदे लढणार

Published:

पक्षाची अधिकृत उमेदवारी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक निकालावर प्रतिकूल परिणाम करण्याची क्षमता असलेल्या बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे 12 नेते एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणावर आणि 4 नेते अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती समोर येत आहे. (16 leaders of BJP will fight from Shinde and Ajit Pawar group)

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट असलेल्या महायुतीला कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनेही मेरिटवर जागावाटप केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत विजय आवश्यक असल्याने दोन्ही गटाकडून काही ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. भाजपाचे 16 नेते शिंदे आणि अजित पवार गटाकडून विशेष म्हणजे लढताना दिसणार आहेत.

नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजप नेते राजेंद्र गावीत, विलास तरे, संतोष शेट्टी, मुरजी पटेल, अमोल खताळ, शायना एन सी, अजित पिंगळे, दिग्वीजय बागल, विठ्ठल लंघे आणि बळीराम शिरसकर हे नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर तर राजकुमार बडोले, प्रताप पाटील चिखलीकर, निशिकांत पाटील आणि संजय काका पाटील हे लढणार आहेत.

Assembly Election शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मिळाली उमेदवारी

निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर त्यांना कुडाळ-मालवणमधून उमेदवारी देण्यात आली. रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. शिवसेनेत विलास तरे यांनी प्रवेश केल्यानंतर संतोष शेट्टी यांना बोईसरमधून, संगमनेर मतदारसंघातून अमोल खताळ यांना, मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्व मतदारसंघातून, पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावीत यांना, मुंबादेवीमधून शायना एन सी यांना, धाराशिवमधून अजित पिंगळे यांना, करमाळा मतदारसंघातून दिग्वीजय बागल यांना, नेवासामधून विठ्ठल लंघे यांना,बाळापूर मतदारसंघातून बळीराम शिरसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img