10.3 C
New York

BJP : महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा ‘मास्टरप्लॅन’ काय?

Published:

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष उमेदवाराच्या प्रचारावर आहे. शिवसेना शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेही (BJP) आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केलाय.

या अंतर्गत पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Modi) इतर बड्या नेत्यांनाही उतरवणार आहे. भाजपचे हे बडे नेते राज्यात 50 हून अधिक सभा घेणार आहेत. पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन देखील हे दिग्गज नेते जाहीर सभांच्या माध्यमातून करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा महाराष्ट्रात अनेक जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.

महाविकास आघाडी की महायुती? राज ठाकरेंचं बेधडक उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभा घेण्याची योजना आखली आहे. दुसरीकडे, आणखी जाहीर सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असणार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही जोरदार पाठिंबा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात 15 सभा घेणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8, अमित शहा 20, नितीन गडकरी 40, देवेंद्र फडणवीस 50, चंद्रशेखर बावनकुळे 40, तर योगी आदित्यनाथ 15 सभा घेणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर होती. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img