राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे. या मुदतीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र तरीही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत धुसफूस झाल्याचे दिसून आले. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मिटला नाही. त्यामुळे काही मतदारसंघात आघाडीतील मित्र पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत.
महाविकास आघडीत सर्व निर्णय चर्चा करून घेतले आहेत. त्यामुळे कोणतेच वाद नाहीत असे नेते सांगत होते. मात्र या नेत्यांना जागावाटपाचा घोळ काही मिटवता आला नाही. त्यामुळे काही मतदारसंघात आघाडीतील घटक पक्षांतच लढत होणार असल्याचे दिसत आहे. अर्ज माघारीपर्यंत जर या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर आघाडीतील पक्षांतच लढत होणार असल्याचे निश्चित आहे.
आजमितीस राज्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राहुल पाटील आणि शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्यात लढत होईल असे चित्र आहे. तसेच पंढरपूर मतदारसंघात भगिरथ भालके (काँग्रेस) विरुद्ध राष्ट्रवादीचे अनिल सावंत यांच्यात लढत होईल. सांगोल्यात अनिल पाटील (शिवेसना उबाठा) विरुद्ध दिलीप माने (काँग्रेस), दिग्रसमध्ये पवन जैस्वाल (शिवसेना उबाठा) विरुद्ध माणिकराव ठाकरे (काँग्रेस), लोहा मतदारसंघात एकनाथ पवार (शिवसेना उबाठा) विरुद्ध श्यामसुंदर शिंदे (शेकाप), रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये प्रसाद भोईर (शिवसेना उबाठा) विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांत लढत होईल.
CM शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट! नेमकं काय घडलं ?
अलीबागमध्ये सुरेंद्र म्हात्रे (शिवसेना उबाठा) विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष, भिवंडीत दयानंद चोरगे (काँग्रेस) विरुद्ध रियाझ आझमी (समाजवादी पार्टी), मालेगाव मध्यमध्ये निहाल अहमद (समाजवादी पार्टी) विरुद्ध एजाज बेग (काँग्रेस) आणि धुळे विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे (शिवसेना उबाठा) आणि समाजवादी पार्टीचे इर्शाद जहागिरदार यांच्यात लढत होणार आहे.
Mahavikas Aghadi महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election) बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देखील सुटला नव्हता.