6 C
New York

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली,डॉक्टरांनी दिला आरामाचा सल्ला

Published:

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष उद्या (31 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसंबंधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) काय भूमिका घेणार याकडे लागून राहिले आहे. मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा परिणाम होण्याची शक्यता अनेक सर्वेक्षणांनी व्यक्त केली आहे. तर याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे यांची प्रकृतीअशातच खालावली आहे. जरांगे यांना अशक्तपणा आला आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Manoj Jarange मनोज जरांगे यांना आरामाचा सल्ला

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतून सत्ताधारी महायुतीला धडा शिकवण्याची भूमिका आधीच जाहीर केली आहे. त्यासोबतच काही उमेदवार उभे करण्याचेही त्यांनी बोलून दाखवले आहे. 29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. मनोज जरांगे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात उमेदावारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंचे अधिकृत उमेदवार कोण आणि विधानसभा निवडणुकीत कोणता निर्णय मराठा समाजाला घ्यायचा, याचा निर्णय उद्या – 31 ऑक्टोबरच्या बैठकीत होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले होते.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे आणि अंतरवाली सराटीत भेटीगाठी सुरु आहेत. अनेक इच्छूक त्यांच्या भेटीसाठी येत आहेत.

“शरद पवार प्रगल्भ नेते पण,”, अजितदादांनी नेमकं काय सांगितलं?

सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते पहाटे किंवा मध्यरात्रीनंतर त्यांच्या भेटीसाठी येत होते. सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांना ताप आहे. अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे गॅलेक्सि रुग्णालयाचे पथक अंतरवाली सराटीत दाखल झाले. डॉक्टरांच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना या तपासणीनंतर आरामाचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img