3.6 C
New York

Raj Thackeray : महाविकास आघाडी की महायुती? राज ठाकरेंचं बेधडक उत्तर

Published:

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही स्वबळावर उमेदवार रिंगण्यात उतरण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी की महायुती, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बेधडक उत्तर दिलंय. महाविकास आघाडी नकोच, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलंय. त्यामुळे निवडणुकीनंतर मनसे भाजपसोबत जाऊ शकतो, असं स्पष्ट संकेतच ठाकरे यांनी दिलेत.

राज्यात काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभेच्यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत राज ठाकरेंचा मनसे पक्ष जाणार असल्याची चर्चा रंगली होती, खरी मात्र, ऐनवेळी राज ठाकरेंकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आणि मनसेकडून उमेदवार रिंगण्यात उभे करण्यात आले.

अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कुठून सुरू झाला; फडणविसांनी नावं घेत सांगितलं

या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले, सध्या राज्याला विकासाचं काम महत्वाच असून आम्हाला महाविकास आघाडी चालणार नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत, हे चित्र स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी नाही तर ठाकरे कोणासोबत हातमिळवणी करणार हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मविआ नाही तर विरोधात महायुती हीच एकमेव आघाडी असून महायुतीमध्ये सद्यस्थितीला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सामिल आहे. त्यामुळे राज ठाकरे पुढील काळात महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना आता वेग आलायं.

Raj Thackeray काँग्रेस-राष्ट्रवादीशी कधी संबंधच आला नाही…

शिवसेेनेत असताना माझ्या आयुष्यात किंवा माझ्याशी संबंध आलेला दुसरा पक्ष म्हणजे भाजप आहे. शिवसेनेत होतो तेव्हा माझा भाजपचे नेते प्रमोद महाजन, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी थेट संबंध आला आहे. माझ्या आयुष्यात माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी भेटीगाठी झाल्या आहेत, पण संबंध कधीच आलेला नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img