12.9 C
New York

Diwali 2024 : वसुबारस म्हणजे काय?, हा सण का साजरा करतात?

Published:

भारतीयांचा दिवाळी हा (Diwali 2024) सर्वात मोठा सण मानला जातो. (Vasu Baras) यामध्येच दिवाळीच्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असली तरी भारतीय दिवाळीची सुरुवात वसुबारसने करतात. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे.

Diwali 2024 वसुबारसचं महत्त्व काय?

गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण. वासरासह असलेल्या गाईचं पूजन वसुबारसच्या दिवशी केलं जातं. गाईच्या पायावर पाणी घालून तिला ओवाळलं जातं. गंध लावला जातो. तसंच, चारा खायला दिला जातो. तिला गंध लावून गाईची पूजा केली जाते. तसंच, घरात लक्ष्मीचे आगमन व्हावं या हेतूनेही गाईची पूजा करण्याचं महत्त्व आहे. दरम्यान, आज सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांपासून सुरु झाला आहे. तर, मंगळवारी 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05 वाजून 04 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.

Diwali 2024 काय आहे वसुबारसची प्रथा?

या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. पाच कामधेनू समुद्रमंथनाच्या वेळेस उत्पन्न झाल्या होत्या हे व्रत त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून केले जाते. वासरासहित गायीची पूजा या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, नवी वस्त्रे त्यांच्या अंगावर घातली जातात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img