8.3 C
New York

Mahavikas Aghadi : आघाडीच्या पाच मतदारसंघात दोन एबी फॉर्म; ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण लढत होणार?

Published:

विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस म्हणजेच 29 ऑक्टोबर शेवटची तारीख असतानाही अनेक मतदारसंघांमधील जागावाटपावरुन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असल्याने अनेक इच्छुकांची धाकाधुक वाढली आहे. असं असतानाच जागावाटपावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद उघडपणे समोर आले आहेत. खास करुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यातील मतभेद प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेत राहिलेत.

Mahavikas Aghadi एकाच मतदारसंघात दोन उमेदवार

महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच उमेदवारी यादीमध्येही या वादाचे प्रतिबिंब पाहायला मिळालं. काँग्रेसने शनिवारी सकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी रात्री उशीरा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार आधीच जाहीर केला आहे तिथे काँग्रेसनेही तिसऱ्या यादीत उमेदवार जाहीर केला.

चंद्रकांतदादांचं टेन्शन मिटलं; कोथरूडमधून बालवडकरांनी माघार

काँग्रेसने शनिवारी रात्री 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाच्या तिन्ही याद्यांमध्ये एकूण 87 उमेदवारांची नावं घोषित झाली. काँग्रेसने तिसऱ्या यादीत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दिग्रस मतदारसंघांतून माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, या मतदारसंघातून आधीच ठाकरेंच्या पक्षाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर केली होती. असं सुमारे पाच मतदारसंघात झालं आहे जिथे महाविकास आघाडीचे ५ मतदारसंघात दोन अधिकृत AB फॉर्मचं वाटप झालं आहे.

Mahavikas Aghadi कोणते आहेत ते मतदारसंघ?

मिरज : शिवसेना-UBT व काँग्रेस

खानापूर-आटपाडी : राष्ट्रवादी-शरद पवार व शिवसेना-UBT

दक्षिण सोलापूर: काँग्रेस व शिवसेना- UBT

दिग्रस : शिवसेना- UBT व काँग्रेस

परांडा : राष्ट्रवादी-शरद पवार व शिवसेना – UBT

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img