महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी जाहीर होताना दिसत आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सोलापूर दक्षिण जागेवरून जोरदार वाद झाला होता. यानंतर अमर पाटील यांना ठाकरे गटाकडून सोलापूर दक्षिण जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र दिलीप माने यांना काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर करताना त्याच ठिकाणी उमेदवारी दिली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसकडून टायपिंग मिस्टेक झाल्याचे म्हटले होते. तसेच नागपूरमध्ये एकच जागा दिल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि इतर मित्रपक्ष या सर्वांचं समाधन होईल, अशाप्रकारचं जागावाटप आमच्याकडून होत आहे. त्यामध्ये 90 चा, 95 चा आणि 100 चा फॉर्म्युला या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. आम्ही सगळे एकत्र लढत आहोत. पण आज मला पाहायला मिळालं की, ज्या सोलापूर दक्षिण जागेवर शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे. त्याच जागेवर काँग्रेसच्या यादीत उमेदवार दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे मी असं मानतो की, ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात, असा इशारा राऊत यांनी दिला होता. तसेच नागपूरमध्ये ठाकरे गटाला फक्त एकच जागा दिल्याप्रकरणी त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. नाना पटोले यांनीयावर आता प्रतिक्रिया दिली.
आजोबा माझ्या पाठिशी; अर्ज भरताच युगेंद्र पवारांची डरकाळी
Nana Patole आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय
दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, कोकणात आम्हालाही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आता संजय राऊतांनी जागावाटपाचा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, संजय राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात टाकली पाहिजे, असा माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. दरम्यान, सोलापूर दक्षिणच्या जागेप्रकरणी बोलताना नाना पटोले म्हणाले, आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे त्या पातळीवर ती चर्चा होईल.