4.1 C
New York

Yugendra Pawar : आजोबा माझ्या पाठिशी; अर्ज भरताच युगेंद्र पवारांची डरकाळी

Published:

लोकसभेला राज्यभर नाही (Yugendra Pawar) तर देशभरात जो मतदारसंघ गाजला तो बारामती मतदारसंघ विधानसभेतही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. लोकसभेला नणंद-भावजयी असा सामना झाला तर आता पवार कुटुंबातच काका-पुतणे असा सामना होत आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारही आजच उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी आपल्यासोबत शरद पवार सुप्रिया सुळे खंबीरपणे उभे आहेत. तसंच, कुटुंब म्हणून आई-वडिलही उपस्थित आहेत. तसंच, संपूर्ण बारामतीकर सोबत आहेत असा विश्वासही युगेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसंच, बोलण्यासाठी माझ्याकडे जास्त काही नाही. कारण मी लहाण असल्यापासून मी शरद पवार साहेब यांना पाहत आलो आहे. तसंच, पवार साहेब माझा अर्ज भरण्यासाठी माझ्यासोबत आले त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहील असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

बारामती नव्या नेतृत्वाचा स्वीकार करेल; शरद पवारांना विश्वास

या बारामतीचं नाव शरद पवार यांनी जगभरात पोहचवलं. मी सुद्धा जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत मी शरद पवारांसारखच काम करत राहील असंही युगेंद्र पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर तुमचा सेवक म्हणून मी कायम तुच्या सेवेत राहील असं आश्वासनही युगेंद्र पवार यांनी बारामतीकरांना यावेळी दिलं आहे. त्याचबरोबर येथे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं कामकरणार आहे.

अजित पवारांचं आव्हान असेल की नसेल याचा मी विचार केला नाही. परंतु, माझ्या पाठीशी शरद पवार साहेब आहेत इतकाच विचार मी करतो असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर जास्त बोलणं टाळलं. तसंच, युगेंद्र पवार यांनी अजित पवारांचं नावही घेतलं नाही. दरम्यान, मी बारामती चारवेळी पिंजून काढली आहे. त्यामुळे मला इथ सगळी परिस्थिती माहिती आहे. जिथं कुणी पोहचत नाही तिथं आपण जाणार असंही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img