कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या आमोल बालवडकरांनी अखेर विधानसभेच्या रणांगणातून माघार घेतली आहे. बालवडकरांच्या माघारीमुळे चंद्रकांतदादा पाटलांचे टेन्शन पूर्णपणे मिटलं असून, दादांना मोठ्या मताधिक्याने संकल्प बालवडकरांनी केला आहे. चंद्रकांतदादा पाटलांनी आज (दि.28) बालवडकर यांची भेट घेतली. त्यावेळी आपण दादांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे बालवडकर यांनी स्पष्ट केले.
अमोल बालवडकर हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपच्या पहिल्या यादीत कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर बालवडकर अपक्ष लढणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. एवढेच नव्हे तर, बालवडकरांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत चंद्रकांतदादांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कोथरूडमध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चा होती.
माहिम मतदारसंघातून सरवणकर अर्ज मागं घेणार का?, अमित ठाकरे म्हणाले
बालवडकरांच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाराज असलेल्या बालवडकरांची भेट घेत त्यांच मनवळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नव्हते. त्यामुळे मतदानापूर्वी चंद्रकांतदादांची धाकधूक वाढली होती. परंतु आता बालवडकरांनी दादांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करण्याची जबाबदारी आपली असल्याचे म्हणत त्यांच्या विजयाचा विडा उचलला आहे. त्यामुळे भाजपसह चंद्रकांतदादांचं मोठं टेन्शन मिटलं आहे.