4.1 C
New York

Sharad Pawar : अनिल देशमुखांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात; पवारांकडून चौथी उमेदवारी यादी जाहीर

Published:

विधानसभेसाठी शरद पवारांकडून (Sharad Pawar) आणखी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा सलील देशमुख यांना काटोल येथून उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीसह शरद पवार गटाच्या उमेदवारांची एकूण संख्या ही 82 इतकी झाली आहे.

Sharad Pawar सात जणांच्या यादीत कोण- कोण?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीत सात उमेदवारांच्या नावांचा समावेश असून, यात माणमधून प्रभाकर घार्गे, काटोलमधून सलील अनिल देशमुख, खानापूर – वैभव सदाशिव पाटील, वाई – श्रीमती अरूणादेवी पिसाळ, दौंड – रमेश थोरात, पुसद – शरद मैंद तर सिंदखेडामधून संदीप बेडसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

राज्यात शंभर टक्के परिवर्तन होणार, जरांगेंकडून सर्व पत्ते ओपन

Sharad Pawar अनिल देशमुखांच्या माघारीनंतर मुलाला उमेदवारी

काटोल मतदारसंघ हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाहून अनिल देशमुख हेच महाविकास आगआडीचे उमेदवार असतील असे मानले जात होते. मात्र, आपल्या उमेदवारीमध्ये रश्मी बर्वे यांच्याप्रमाणे अडथळ निर्माण केला जाऊ शकतो. यासाठी दिल्लीतून दिग्गज वकील आल्याचा दावाही देशमुख यांनी केला होता. यानंतर अनिल देशमुख यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या माघारीनंतर अखेर या मतदारसंघातून अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Sharad Pawar सलील देशमुख विरूद्ध ठाकूर थेट लढत

पवारांच्या चौथ्या यादीपूर्वी भाजपकडून 25 उमेदवार असलेल्या तिसऱ्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. यात भाजपकडून काटोल विधानसभा मतदारसंघातून चरणसिंग बाबुलाल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाकडून याच मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे आता ठाकूर विरूद्ध देशमुख अशी थेट लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img