5.3 C
New York

Sharad Pawar : शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार

Published:

विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून (Ncp Sharad pawar group) तिसरी यादी जाहीर करण्यात आलीयं. शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीत परळीतून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात तगडा उमेदवारी जाहीर केलायं. परळीतून राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवण्यात आलं असून चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.

तिसऱ्या यादीनूसार करंजा मतदारसंघातून ज्ञायक पटणी, हिंगणघाटमधून अतुल वांदिले, हिंगणा मतदारसंघात रमेश बंग, अणुशक्तीनगर मतदारसंघात फहाद अहमद, चिंचवडमध्ये राहुल कलाटे, भोसरी मतदारसंघात अजित गव्हाणे, माझलगाव मतदारसंघात मोहन बाजीराव जगताप, परळी मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख, तर मोहोळमधून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी घोषित करण्यात आलीयं.

उमेदवार न देता मविआचा चक्क अपक्षाला पाठिंबा; कारण काय?

शरद पवार गटाकडून आत्तापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आत्तापर्यंत 11 महिला उमेदवारांना संधी देण्यात आलीयं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पहिली यादी ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना तर शेवगाव मतदारसंघातून प्रताप ढाकणे यांना तर हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीयं. तसेच इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिलीयं. तर जयंत पाटील यांना इस्लामपूरमधून, अनिल देशमुख यांना काटोल तर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घनसांगवीतून, जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा-कळव्यातून आणि हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाने पहिली 45 जणांची यादी जाहीर केल्यानंतर दुसरी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीनूसार येवल्यात भुजबळांविरोधात माणिकराव शिंदेना उमेदवारी दिली. तर अकोल्यात अजित पवार गटाच्या किरण लहामटेंविरोधात अमित भांगरे यांना मैदानात उतरवलं. भांगरे यांचा नवखा चेहरा शरद पवारांकडून मैदानात उतरवण्यात आलायं. शरद पवार गटाकडून पहिली 45 तर दुसरी 22 आणि आता तिसरी यादी 9 जणांची यादी जाहीर करण्यात आलीयं. आत्तापर्यंत एकूण 76 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img