5.1 C
New York

Bandra Terminus : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; दोन जणांची प्रकृती चिंताजनक

Published:

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या (Bandra Terminus) फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतील जखमी प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळीच प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकांत प्रचंड गर्दी होत आहे. आजही उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकात जमले होते. गर्दी इतकी होती की पोलिसांनाही नियंत्रित करता आली नाही.

बांद्रा गोरखपूर एक्सप्रेस रेल्वे फलाटावर येताच रेल्वेत प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. याच दरम्यान पळापळ सुरू झाली. त्यामुळे बरेच जण चेंगराचेंगरीत सापडले गेले. भाभा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. रितेश यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत एकूण ९ प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

दिवाळीत हृदयाचं आरोग्य जपा; कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराच!

या घटनेवर बृहन्मुंबई महापालिकेने प्रतिक्रया दिली आहे. दिवाळी सणासाठी मुंबईतून लोक त्यांच्या गावी निघाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी झालेले प्रवासी फरशीवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img