5.3 C
New York

Jayant Patil : वांद्रे टर्मिनसवर झालेल्या दुर्घटनेवरून, जयंत पाटलांची सरकारवर टीका

Published:

आज, रविवारी (27 ऑक्टोबर) पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत नऊ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. विरोधकांकडून आता राज्यसरकारवर या दुर्घटनेप्रकरणी टीका होताना दिसत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेत या सरकारचं लक्ष फक्त बुलेट ट्रेनकडे असल्याची सडकून टीका केली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यातील महिलांची असुरक्षित ही चव्हाट्यावर आली आहे. आमच्या लाडक्या बहीणी महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, हे वारंवार सिद्ध झालं आहे. अशातच आज पहाटे वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी होऊन 9 जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती अत्यावस्थ आहे. वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे झालेली गर्दी या सरकारला सांभाळता आलेली नाही आणि योग्य व्यवस्थापनही करता आलेलं नाही. कारण महाराष्ट्रातील आणि दिल्लीच्या सरकारचं लक्ष्य फक्त बुलेट सारख्या मोठ्या प्रकल्पावर आहे, अशी टीका त्यांनी केली.

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार

जयंत पाटील म्हणाले की, मुंबई आणि उपनगरातील प्रवास करणाऱ्या बांधवांना चेंगराचेंगरींना तोंड द्यावं लागत आहे. तर दुसरीकडे लक्झरी रेल्वे देशात सुरू करून श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सातत्याने केलं आहे. आज वांद्रे टर्मिनसवर पहाटे झालेली चेंगराचेंगरी पाहता हे सरकार मुंबईतल्या सामान्य नागरिकांडे किती दुर्लक्ष करत आहे, हे यातून दिसून येतं. अलिकडे रेल्वे प्रशासन, मुंबईचं प्रशासन आणि महाराष्ट्रातील प्रशासनाने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत, ही अतिशय चितेंची बाब आहे. मुंबईकर रेल्वेने प्रवास करत असताना त्यांची सुरक्षितता बघणं हे सरकारचं अग्रक्रमाणे काम आहे, पण या सरकारने त्या बाबतीत कायम दुर्लक्ष केलंय. आज वांद्र्याला पहाटेच्या वेळी घटना घडली. मात्र दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या रेल्वेतील गर्दीचं योग्य नियोजन केलं नाही तर अशाप्रकारचे प्रसंग घडू शकतात. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने ज्याच्यावर ही जबाबदारी होती, त्या सर्वांचा निषेध करतो, असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून आपली प्रतिक्रिया देतील

दरम्यान, श्रीमंत लोकांनी लक्झरी आणि ऐश्वर्यात जगायचं. महाग तिकीट काढून रेल्वेने आणि विमानाने प्रवास करायचं, पण कष्टकरी वर्ग जो साध्य रेल्वेत प्रवास करतो. त्याने चेंगराचेंगरी तोंड द्यायचं. ही आज मुंबईकरांची अवस्था सगळ्या महाराष्ट्रातील लोक अनुभवत आहेत. मात्र श्रीमंतांचे चोचले पुरवणारे हे सरकार महाराष्ट्रातील जनतेकडे दुर्लक्ष करत आले आहेत, याची अनेक उदाहरण आहेत. त्यामुळे मी अपेक्षा करेल की, महाराष्ट्रातील जनता या दुर्घटनेतून उद्याच्या निवडणुकीत आपली प्रतिक्रिया देईल. कारण केंद्र सरकारने जेव्हापासून रेल्वेचं बजेट बंद केलेलं आहे, तेव्हापासून रेल्वेच्या समस्या वाढत आहेत. रेल्वेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारला वेळ मिळत नाही. त्यातून अश्या घटना घडतात, असं माझ मतं आहे, अशी रोखठोक भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img