5.3 C
New York

Manoj Jarange : माजी मुख्यमंत्र्यांची सून, आमदार खासदार अन् जरांगे पाटलांमध्ये मध्यरात्री खलबतं

Published:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजलंय. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष काता कसून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्नचा मोठा फटका महायुतीला बसलाय. त्यामुळे या पार्श्वभूमीवर (Assembly Election 2024) आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. प्रचार सभा, भेटीगाठी आणि पक्षप्रवेश यांना देखील मोठा वेग आलाय. आंतरवाली सराटीत देखील मोठे खलबतं सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना अनेक महत्वाचे नेते भेटत आहेत. हे नेते आगामी विधानसभा निवडणूक आणि मराठा मतांबद्दल प्रामुख्याने चर्चा करत आहेत. या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर जरांगे पॅटर्न (Manoj Jarange) चालत आहे. त्या अनुषंगाने या भेटीगाठी अधिक महत्त्वाच्या असल्याचे बोललं जातंय.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात मराठा उमेदवारांना उतरवण्याची भूमिका घेतलेली ( Political Leaders Meeting With Manoj Jarange) आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे उमेदवार जरांगे पाटलांची भेट घेत आहेत. आंतरवाली सराटीत सध्या राजकीय घडामोडींना उधाण आलंय.

‘फडणवीसांशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही, ते आमचे..’ संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा

दिवंगत मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुनबाई संगीता निलंगेकर यांनी देखील नुकतीच मनोज जरांगे पाटलांची (Antarwali Sarati) भेट घेतली. निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचे पती अशोकरावर निलंगेकर कॉंग्रेसकडून इच्छुक होते. परंतु कॉंग्रेसने अभय साळुंके यांना तिकीट दिलंय. त्यामुळे संगीता निलंगेकर नाराज झाल्याचं दिसंतय. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटलांकडून उमेदवारीची अपेक्षा देखील व्यक्त केलीय. या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी देखील आंतरवाली सराटीत मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव माने यांनी भाजपमधून छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला होता. ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. माने छत्रपती संभाजी राजे अन् जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहेत. जरांगे पाटलांचा आदेश असेल, तर मला विजयाची खात्री आहे अशी प्रतिक्रिया शिवाजीराव माने यांनी दिलीय.
संभाजी ब्रिगेड 50 जागा स्वबळावर लढणार, राजेंद्र शिंगणेंविरोधात दिला पहिला उमेदवार…

हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली. हिंगोली विधानसभेची जागा वाटाघाटीमध्ये ठाकरे गटाला सुटली. त्यांनी रूपाली पाटील गोरेगावकर यांना तिकीट दिल्यामुळे भाऊराव पाटील गोरेगावकर नाराज झालेत. यामुळे भाऊराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाऊराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचं समजतंय.

हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली. माधवराव पाटील जळगावकर आणि जरांगे पाटलांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झालीय. नांदेड दक्षिण काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी देखील जरांगे पाटलांची भेट घेतली. आज त्यांना काँग्रेसकडून नांदेड दक्षिणसाठी दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हंबर्डे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img