राज्यातील जनतेसाठी उद्याच्या सरकारकडून दिवाळीची शुभ भेट म्हणून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यासाठी आमचा जाहीरनामा तयार आहे. आम्ही 30 तारखेला हा जाहिरनामा प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहिती आज सकाळी माध्यमांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. तसेच आम्ही भाजपाच्या जाहीरनाम्याची वाट पाहत आहोत, 15 लाखाच्या ठिकाणी पंधराशे रुपये देऊन जी जनतेची बोळवणी केली, त्यामुळे अजून पुढे काय त्या जाहीरनाम्यामध्ये आहे, हे लक्षात येते असे म्हणत वडेट्टीवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. (Vijay Wadettiwar on Congress Jahirnama.)
तसेच आमचा जाहीरनामा हा सर्वसमावेशक असणार आहे. शेतकऱ्यांपासून ते शेतमजुरापर्यंत सर्वांना न्याय देणारा आमचा जाहीरनामा असेल असेही ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी मनसेवर देखील टीका केली आहे. मनसेचा झेंडा नेहमी बदलत असतो. तो झेंडा पंचरंगी पूर्वी होता, आता एकच रंग आहे. त्यामुळे मनसे नेहमी आपली भूमिका बदलत असतात. त्यांचा झेंडा बदलला तर त्यांची भूमिका बदलते, असी सडकून टीका त्यांनी मनसेवर केली आहे.
काँग्रेसच्या यादीत ट्विस्ट! यादी जाहीर होताच मोठ्या नेत्याची माघार?
लोकांना बनवाबनवी नको आहे, लोकांना गॅरंटी पाहिजे. जी गॅरंटी आम्ही तेलंगणा तसे कर्नाटकामध्ये पाळली आहे. महालक्ष्मी योजना अद्यापही सुरू आहे. तिथे काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारण त्यांनी खोटी अफवा पसरवली की, तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये महालक्ष्मी योजना बंद पाडली. मात्र ती योजना अद्यापही सुरू आहे, असे वडेट्टीवारांनी सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसचा जाहिरनामा आम्ही 30 तारखेला प्रसिद्ध करणार आहोत, अशी माहिती दिली आहे. तसेच आम्ही भाजपाच्या जाहीरनाम्याची वाट पाहत आहोत, 15 लाखाच्या ठिकाणी पंधराशे रुपये देऊन जी जनतेची बोळवणी केली, त्यामुळे अजून पुढे काय त्या जाहीरनाम्यामध्ये आहे, हे लक्षात येते असे म्हणत वडेट्टीवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.