राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ( Assembly Election) सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वत्र प्रचाराची धूम सुरू आहे. दरम्यान माहीमच्या जागेवरून तिन्ही ‘सेना’ पक्ष आमनेसामने आहेत. तिघेही जोरदारपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान भाजपमधील (BJP) महायुतीने राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचे पुत्र अमित यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना पाठिंबा देण्याची मागणी भाजपने महायुतीकडे केलीय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे. सदा सरवणकर हे सध्या माहीम विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत. यामुळे महायुतीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असल्याचं समोर आलंय.
मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भाजपने महायुतीकडे मागणी केल्याचं समोर आलंय. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक असून त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे. शिंदे गटाचे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आहेत. शिंदे गटाने त्यांना पुन्हा उमेदवार म्हणून घोषित केलंय.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी; दोन जणांची प्रकृती चिंताजनक
यासोबतच शिवसेना ठाकरे गटाने या जागेवरून आपला उमेदवार उभा करण्याची घोषणा केलीय. मात्र, सदा सरवणकर यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना अमित ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. माहिम मतदारसंघ राज्यातील अशी जागा आहे. जिथे शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन शक्ती आमनेसामने आहेत. मध्य मुंबईतील माहीम मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलीय.
अमित ठाकरे हे निवडणूक लढवणारे कुटुंबातील तिसरे व्यक्ती आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा होताच माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची स्थिती निर्माण झाली आहे. आता मनसेला माहीम विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेचे उबाठाचे महेश सावंत यांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.