4.4 C
New York

Uddhav Thackeray : ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, मुंबईतल्या जागांवर 3 शिलेदार रिंगणात…

Published:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) तिसरी (UBT) यादी जाहीर केली आहे. ठाकरेंनी या तिसऱ्या यादीत 3 उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत वर्सोवा, घाटकोपर आणि विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील (Vileparle Assembly Constituency) उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या यादीत मुस्लीम चेहऱ्याचा ठाकरे गटाने समावेश केलाय.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे आज सकाळी दुसरी यादी जाहीर केली, त्यात 15 नावांचा समावेश आहे. आणि आता ठाकरे गटाने तिसरी यादी जाहीर केली असून त्यात तीनच नावांचा समावेश आहे. या यादीत ठाकरे गटाने वर्सोवा मतदारसंघात पहिला मुस्लिम उमेदवार उभा केला. वर्सोवा हा भाजपचा बालेकिल्ला असून ठाकरे गटाने हरुण खान यांना या मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले.

विलेपार्ले मतदारसंघातून भाजपचे पराग अळवणी यांच्या विरोधात माजी नगरसेवक संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. तर घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray ठाकरे गटाची तिसरी यादी

वर्सोवा – हरुण खान
घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
विलेपार्ले – संदीप नाईक

Uddhav Thackeray दहिसर जागेवर अद्याप उमेदवार नाही…

दहिसर मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर इच्छुक आहेत. मात्र घोसाळकरांना अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तसेच विनोद घोसाळकर यांच्या जागी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना तिकीट देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून घोसाळकर कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img