4.4 C
New York

Sujay Vikhe : सुजय विखेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम

Published:

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या (Sujay Vikhe) संकल्प सभेचे आयोजन संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे करण्यात आलं होतं. या सभेत भाजपच्या एका वक्त्याने जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षातून या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. काही ठिकाणी अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या तर काही ठिकाणी गाड्यांना आग देखील या विधानामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी लावण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. या प्रकरणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मला मारण्याचा कट होता असा दावा सुजय विखेंनी केला आहे.

संगमनेरमधील एका सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांच्याकडून डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या अपशब्दाविरुद्ध संगमनेरमधील थोरात कार्यकर्त्यांनी निषेध सुरू केला. त्याचवेळी रात्री डॉ. सुजय विखे पाटील सभेनंतर रात्री परतताना त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने पूर्व नियोजित कट करुन प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप सुजय विखे यांनी केला.

मविआच्या जागावाटपावर बाळासाहेब थोरातांचे महत्वाचे वक्तव्य

संबंधित व्यक्ती त्या भागातील असल्याने त्यांना बोलावलं होतं. ते महायुीच्या संबंधित नाहीत. स्थानिक असल्याने त्यांना बोलावण्यात आलं होतं. मी त्यांना भाषणा दरम्यान थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र ते थांबले नाहीत. आता जर गुन्हा दाखल झाला असेल तर योग्य कारवाई करा. पण त्यांचं वक्तव्य बाजूलाच राहिलं नंतर मात्र वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली. मला मारण्यासाठीच हा कट होता. त्यांच्याच यंत्रणेतून मला फोन आला. म्हणून मी रस्ता बदलला आणि वाचलो.

सभा आटोपून निघताना त्यांच्याच यंत्रणेतून मला एकाचा फोन आला. तुम्ही या रस्त्याने येऊ नका दुसऱ्या रस्त्याने जा हे लोकं असे असे करणार आहेत असे सांगितले गेले. म्हणून मी रस्ता बदलला आणि वाचलो असे सुजय विखे म्हणाले. वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा माझं काहीच म्हणणं नाही पण रात्री महिलांना वाहनांतून बाहेर काढून हल्ला करता हेच संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आलं आहे असेही सुजय विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img