देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या शहरांत प्रदूषणाची (Air Pollution) समस्या अतिशय वेगाने वाढत चालली आहे. दिल्लीतील अनेक भागात AQI म्हणजेच Air Quality Index ने 300 चा टप्पा पार केला आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांतही दिवसागणिक प्रदूषण वाढत चाललं आहे. ही स्थिती अतिशय धोकादायक आहे कारण यावेळी हवेत उपस्थित असणारे स्मॉल पार्टीकल्स तुमच्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरू शकतात. याच कारणामुळे दिल्लीतील लोकांना सध्या खोकला, डोकेदुखी, डोळ्यांत जळजळ, थकवा अशा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या प्रदूषणामुळे शरीरावर काही दीर्घकालीन दुष्परिणाम सुद्धा जाणवू शकतात.
दिल्लीतील वायू प्रदूषण (Air Pollution) सध्या अतिशय धोकादायक पातळीत पोहोचलं आहे. त्यामुळे आगामी काळात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीत येथील हवेत श्वास घेणे म्हणजे एका दिवसात 12 सिगरेट स्मोकिंग करण्यासारखं आहे. इतकेच नाही तर हे प्रदूषण तुम्हाला अनेक आजारांनी ग्रस्त करू शकते.
Air Pollution प्रदूषणामुळे होणारे आजार
एक्सपर्ट्सच्या मते प्रदूषण शरीरातील फुप्फुसांना सर्वाधिक नुकसान करू शकते. यांमुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर अशा घातक प्रदूषणामुळे स्किन कॅन्सरचाही (Skin Cancer) धोका निर्माण होऊ शकतो. प्रदूषित हवेत अनेक प्रकारचे घातक पार्टीकल्स असतात. यामध्ये वोलेटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड, पोलीसायक्लिक एरोमेटिक पॉल्यूटेंट आणि पार्टीक्यूलेट मॅटर प्रमुख आहेत. हे अतिशय धोकादायक पार्टीकल्स मानवी त्वचेसाठी प्रचंड नुकसानदायक ठरू शकतात. एक्सपर्ट्सच्या मते सध्या ज्या प्रकारचे प्रदूषण (Pollution) आहे यामध्ये अनेक प्रकारचे धोकादायक पार्टीकल्स आहेत. यामुळे त्वचा, डोळे आणि श्वासाबरोबर शरीरात प्रवेश करून नुकसान करत आहेत. याचा परिणाम आज दिसून येत नसला तरी भविष्यात मोठे दुष्परिणाम दिसू शकतात. यामध्ये स्किन कॅन्सरचाही समावेश असू शकेल. या पार्टीकल्सने एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर बराच काळ ते शरिरातच राहतात. त्यांना बाहेर काढता येणेही शक्य होत नाही.
Air Pollution प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम
डॉक्टरांच्या मते प्रदूषणामुळे त्वचेतील पेशींमध्ये ऑक्सीडेटीड स्ट्रेसमुळे त्वचा खराब होत आहे. याच कारणामुळे जास्त बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींचा चेहरा अकाली वृद्ध दिसू लागतो. प्रदूषणामुळे त्वचेवर एक्स्ट्रा पिगमेंटेशन आणि रिंकल्स येण्यास सुरूवात होते. त्वचेवर कोरडेपणा जास्त प्रमाणात दिसू लागतो.
Air Pollution त्वचेची काळजी कशी घ्याल
प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी त्वचा नेहमी मॉईश्चराईज ठेवा. यासाठी तुम्ही खोबरेल तेल आणि चांगल्या मॉईश्चराईज क्रिमचा वापर करू शकता.
अंघोळ करताना जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. यामुळे देखील त्वचेला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. पण जास्त पाणी पिणे देखील नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे दिवसातून किती पाणी प्यायला हवं याची माहिती डॉक्टरांकडून घ्या
घराबाहेर पडताना त्वचा जास्तीत जास्त कव्हर करा. ज्यामुळे प्रदूषणाचा प्रभाव पडणार नाही.
सकाळी किंवा संध्याकाळी ज्यावेळेस वाहतूक जास्त असेल त्यावेळी पायी फिरायला जाऊ नका.
डाएटची काळजी घ्या. आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या आणि फळांचे सेवन करा. लिक्वीड डाएट जास्त प्रमाणात घ्या