विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून आता शरद पवार (Sharad Pawar) गटाने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. येवल्यात भुजबळांविरोधात माणिकराव शिंदेना उमेदवारी दिली. तर अकोल्यात अजित पवार गटाच्या किरण लहामटेंविरोधात अमित भांगरे यांना मैदानात उतरवलं.भांगरे यांचा नवखा चेहरा आहे.
दोन दिवसांपूर्वी पहिली यादी जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाने शनिवारी दुसरी यादी जाहीर केली आहे. जयंत पाटील यांनी शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत 22 नावांची घोषणा केली. पूर्वीचे 45 आणि आज (शनिवारी) जाहीर केलेले 22 उमेदवार अशा 67 जणांना शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केल्याचं जयंत पाटील म्हणाले. दुसऱ्या यादीत नगरमधून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली.
तर अमित भांगरे यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाली. सतीश पाटील यांना एरंडोलमधून उमेदवारी देण्यात आली. गंगापूरमधून अजित पवार यांना सोडणारे विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय, पुण्यातील दोन जागांवरही शरद पवार गटाने उमेदवार दिले. सचिन दोडके यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संभाजीराजेंनी घेतील जरांगे पाटलांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
Sharad Pawar बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना उमेदवारी…
बीडमध्ये शरद पवारांचा उमेदवार कोण असेल? याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. शेवटी बीड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ज्योती मेटे, जयदत क्षीरसागर, राजेंद्र मस्के यांच्या नावांच्या चर्चांना विराम मिळाला.
Sharad Pawar भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे रिंगणात…
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांविरोधात येवल्यात शरद पवार गटाने माणिकराव शिंदेंना मैदानात उतरवलं. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध शिवसेना संभाजी पवार अशी लढत असायची.
Sharad Pawar परंडा मतदारसंघात शरद पवार, ठाकरेंचाही उमेदवार
परंडा मतदारसंघात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला. शरद पवार गटाने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी दिलीय. तर ठाकरे यांनी रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोण माघार घेईल किंवा येथे मैत्रीपूर्ण लढत होईल हे समोर येणार आहे.
शरद पवार गटाची दुसरी यादी…
- एरंडोल – सतीश पाटील
- गंगापूर- सतीश चव्हाण
- शहापूर- पांडुरंग बरोरा
- परांडा- राहुल मोटे
- बीड- संदीप क्षीरसागर
- आर्वी- मयुरा काळे
- बागलान- दीपिका चव्हाण
- येवला- माणिकराव शिंदे
- सिन्नर- उदय सांगळे
- दिंडोरी- सुनीता चारोस्कर
- नाशिक- पूर्व गणेश गीते
- उल्हासनगर- ओमी कलानी
- जुन्नर- सत्यशील शेरकर
- पिंपरी- सुलक्षणा शीलवंत
- खडकवासला- सचिन दोडके
- पर्वती- अश्विनीताई कदम
- अकोले- अमित भांगरे
- अहिल्यानगर शहर- अभिषेक कळमकर
- माळशिरस- उत्तमराव जानकर
- फलटण- दीपक चव्हाण
- चंदगड- नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
- इचलकरंजी- मदन कारंडे