विधानसभेसाठी काँग्रेसची (Congress) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात सावनेरमधून सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी तर, कामठीमधून सुरेश भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कैलास गोरंट्याल यांना जालन्यातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिरोळ मतदार संघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत काही विद्यमान आमदारांची नाव यादीत असली तरी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून विद्यमान आमदार लहू कानडे यांचं तिकीट कापून हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Congress कुणा कुणा मिळाली संधी?
– भुसावळ- राजेश मानवतकर
– जळगाव – (जामोद) – स्वाती वाकेकर
– अकोट – महेश गंगाणे
– वर्धा – शेखर शेंडे
– सावनेर – अनुजा केदार
– नागपूर दक्षिण- गिरीश पांडव
– कामठी- सुरेश भोयर
– भंडारा- पूजा ठावकर
– अर्जुनी मोरगांव – दिलीप बनसोड
– आमगाव- राजकुमार पुरम
– राळेगाव- वसंत पुरके
– यवतमाळ – अनिल मांगुळकर
– अर्णी (अज) – जितेंद्र मोघे
– उमरखेड (अजा) – साहेबराव कांबळे
देवेंद्र फडणवीसांकडे ‘इतक्या’ कोटींची संपत्ती; लाखोंचं सोनं, जमीन अन् 62 लाखाचं कर्जही..
– जालना – कैलास गोरंट्याल
– औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
– वसई – विजय पाटील
– कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
– चारकोप – यशवंत सिंग
– सायन कोळीवाडा – गणेश यादव
– श्रीरामपूर (अनुसूचित जाती) हेमंत ओगले
– निलंगा – अभयकुमार साळुंखे
– शिरोळ – गणपतराव पाटील