5.1 C
New York

MNS : मनसेची पाचवी यादी जाहीर, या 15 उमेदवारांना दिली संधी

Published:

आपली पाचवी यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जाहीर केली आहे. स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसेने आतापर्यंत चार याद्या जाहीर केल्या. यामधून आत्तापर्यंत 70 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 15 उमेदवारांची नावे मनसेने पाचव्या यादीत जाहीर केली आहेत. यामध्ये कोल्हापूर, बीड, नागपूर, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील काही जागांचा समावेश करण्यात आला आहे. (MNS fifth list declared ahead of assembly elections 2024)

महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत राज्यात असताना मनसेने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात अनेक ठिकाणी दौरे करत पदाधिकारी आणि कार्याकार्यांच्या भेटी घेतल्या. विशेष म्हणजे दुसऱ्या यादीत मनसेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे उमेदवार म्हणून नाव घोषित केले. ते माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

MNS हे आहेत ते 15 उमेदवार


पनवेल – योगेश चिले
खामगाव – शिवशंकर लगर
अक्कलकोट – मल्लिनाथ पाटील
सोलापूर शहर मध्य – नागेश पासकंटी
जळगाव जामोद – अमित देशमुख
मेहकर – भय्यासाहेब पाटील
गंगाखेड – रुपेश देशमुख
उमरेड – शेखर टुंडे
फुलंब्री – बाळासाहेब पाथ्रीकर
परांडा – राजेंद्र गपाट
उस्मानाबाद – देवदत्त मोरे
काटोल – सागर दुधाने
बीड – सोमेश्वर कदम
श्रीवर्धन – फैझल पोपेरे
राधानगरी – युवराज येडुरे

ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, मुंबईतल्या जागांवर 3 शिलेदार रिंगणात…

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विविध सभांच्या माध्यमातून पहिल्या 7 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर मनसेने दुसरी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर तिसरी 13 उमेदवारांची यादी, तर चौथ्या यादीमध्ये 5 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आता पाचव्या यादीत 15 जणांची नावे मनसेकडून जाहीर करण्यात आली आहे. असे एकूण 85 उमेदवारांची घोषणा मनसेकडून करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img