इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या मोठा तणाव (Israel Iran Conflict) निर्माण झाला आहे. इराणने १ ऑक्टोबर या दिवशी इस्त्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ले केले होते. इस्त्रायलने या हल्ल्यांचा बदला (Israel Attack) घेतला आहे. इराणमधील दहा सैन्य ठिकाणांवर आज इस्त्रायलने जोरदार हवाई हल्ले केले. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सेवेट यांनी सांगितले की हवाई हल्ल्यांतून इराणला प्रत्युत्तर (Iran) दिलं आहे. इस्त्रायलने हल्ले नेमक्या कोणत्या ठिकाणी केले याची खात्रीशीर माहिती अजून मिळालेली नाही. इस्त्रायलने फक्त इतकंच सांगितलं आहे की आम्ही इराणच्या सैन्य ठिकाण्यांवर हल्ले केले आहेत. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायलने इराणवर हल्ला करण्याच्या काही वेळ आधीच याची माहिती अमेरिकी व्हाईट हाऊसला दिली होती.
याआधी इराणने इस्रायलवर मिसाईल हल्ला केला होता. इराणने १०० पेक्षा जास्त मिसाईल डागल्या होत्या. इस्रायली सुरक्षा दलांनी याला दुजोरा दिला होता. इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले होते. तेव्हापासून या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची तयारी इस्त्रायल करत होता. आज संधी मिळाली आणि इस्त्रायली सैन्याने इराणच्या सैन्य ठिकाणांवर अचूक मारा केला.
तुम्हाला अजूनही आभा कार्ड मिळालं नाही? घर बसल्या कसे मिळवाल कार्ड..
इस्त्रायलच्या या हल्ल्यांचा तेल प्रकल्प किंवा आण्विक साईट्सवर कोणताही परिणाम झालेला नाही. फक्त लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानसह अन्य शहरांतील लष्करी तळांवर हल्ले झाले आहेत अशी माहिती इराणी प्रसारमाध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यांसह इस्त्रायलने सीरिया आणि दक्षिण मध्य येथील लष्करी तळांवरही हल्ले केले. सीरियाची सरकारी वृत्तसंस्था SANA च्या रिपोर्टनुसार, इस्त्रायलने मध्यरात्री २ वाजता दक्षिण आणि मध्य सीरियातील लष्करी तळांवर हल्ले केले. एअर डिफेंन्स सिस्टीमने काही क्षेपणास्त्रे पाडली आहेत. अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
आयडीएफ प्रवक्ते डॅनियल हॅगरी यांनी एका व्हिडिओत सांगितले, की इस्त्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आयडीएफ इराणच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे. इराण आणि त्याचे सहकारी मागील ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्त्रायलवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. त्यामुळे आम्हालाही प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. आम्ही इस्त्रायल आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जे आवश्यक असेल ते सर्व आम्ही करू.