मोठी बातमी समोर येत आहे. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे यावेळी नवाब मलिक यांना तिकीट न देता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र नवाब मलिक हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून नवाब मलिक हे अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नवाब मलिका यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी हात जोडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बंददाराआड अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि नवाब मलिक यांच्यामध्ये चर्चा झाली.
ठाकरे गटाचा दहिसरमध्ये उमेदवार ठरला, तेजस्वी घोसाळकरांनी घेतला एबी फॉर्म….
या बैठकीत नवाब मलिक यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडणूक लढवू नका अशी विनंती करण्यात आली, पण तरी देखील नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक यांची या भेटीनंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी निवडणूक लढवण्यावर ठाम असून, मी निवडणूक लढणार, लढणार आणि लढणारच. 29 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
Nawab Malik मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध
नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध करण्यात आला. भाजपच्या विरोधामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र नवाब मलिक हे निवडणूक लढवण्यावर मुलीला तिकीट मिळाल्यानंतर देखील ठाम आहेत, उमेदवारी अर्ज 29 तारखेला भरणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्या या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.