4.4 C
New York

Balasaheb thorat  : मविआच्या जागावाटपावर बाळासाहेब थोरातांचे महत्वाचे वक्तव्य

Published:

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अजूनही काही जागांवर जागा वाटपाचा पेच मविआमध्ये सुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात बाहेर येऊन मीडियाशी बोलले. “उद्धव ठाकरेंसोबत मी चर्चा केलेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि रमेश चेन्नीथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना भटेण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का? हा विचार चर्चेमध्ये होता. त्या दृष्टीने काही चर्चा झाली. विषय काही असे असतात, प्रत्यक्ष जाऊन भेटून बोलणं ज्यात आवश्यक असतं. मी चेन्नीथला आणि खरगे साहेबांना बैठकीत जे झालं ते सांगणार” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“काही कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत. काही कार्यक्रम राहुलजी, उद्धव ठाकरे यांना एकत्र येऊन करायचे आहेत. बाळासाहेब थोरात म्हणाले, त्या विषयीचर्चा झाली” . उमेदवारी अर्ज दाखल करायला दोन दिवस बाकी आहेत, किती जागांवर चर्चा बाकी आहे? बाळासाहेब थोरात यावर म्हणाले की, “निवडणुकीत शेवट्च्या क्षणापर्यत अशा गोष्टी चालत असतात. आम्ही मैत्रीपूर्ण लढती अजिबात करणार नाही. महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त जागा जिंकून आणणार. आम्ही 180 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच लक्ष्य ठेवलं आहे. आम्हाला सरकार आणायच आहे. मुख्यमंत्री बसवायचा आहे”

मनसेचं ठरलं, CM शिंदेंच्या विरोधात उमेदवार देणार नाही; राजकीय ट्विस्टचं कारण..

Balasaheb thorat  आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

जयश्री थोरात यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारलं. “लोकशाहीत मत मांडण्याचा राजकराणात भाषण करण्याचा, अधिकार आहे. पूर्वी उच्च पातळीला हे सर्व चालायत. पण पाच वर्षात दुर्देवाने मागच्या पातळी घसरली आहे. त्याच स्वरुप पहायला मिळतय” असं बाळासाहेब थोरात म्हणाले. “सुजय विखे पाटील संगमनेर तालवुक्यात येतात, त्याचा तो अधिकार आहे. भाषण कोणात्या थराच करतात. जयश्री संदर्भातील वक्तव्याचा निषेध सुरु आहे. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. संगमनेरमध्ये परिस्थिती संभाळायला जयश्री थोरात समर्थ आहे” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img