राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत सात उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी अजित पवारांनी ३८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांचेही नाव आहे. दरम्यान, झिशान सिद्दीकी यांनी आजच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा भावनिक दिवस आहे. या कठीण काळात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा आभारी आहे. मला वांद्रे येथून उमेदवारी मिळाली आहे. मला खात्री आहे की, सर्व लोकांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी वांद्रे पूर्व विधानसभा जागा नक्की जिंकेल अशी शब्दांत झिशान सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
याचबरोबर इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव-कवठे महाकाळमधून संजयकाका रामचंद्र पाटील, अणुशक्ती नगरमधून सना मलिक, वडगाव शेरीतून सुनील टिंगरे, शिरूरमधून ज्ञानेश्वर (माऊली) कटके आणि लोहामधून प्रताप पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे. दरम्यान, दुसऱ्या यादीत नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला तिकीट देण्यात आले आहे.नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना विरोध केला. त्यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांनीही विरोध केला होता.
उद्धव ठाकरे चार ते पाच जागी उमेदवार बदलण्याची शक्यता
Zeeshan Siddique बाबा सिद्दीकी यांची हत्या
12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे येथे प्रख्यात राजकारणी बाबा सिद्दीकी यांची तिघांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. याप्रकरणात आत्तापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे मात्र गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार, तसेच शुभम लोणकर आणि झिशान सिद्दीकी हे तिघे अद्यापही पोलिसांच्या ताब्यात सापडलेले नाहीत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असून याप्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत.