8.3 C
New York

ABHA Card : तुम्हाला अजूनही आभा कार्ड मिळालं नाही? घर बसल्या कसे मिळवाल कार्ड..

Published:

देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिक घेत आहेत. वेगवेगळ्या प्रवर्गातील लोकांचा विचार करून वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात आणि अमलात आणल्या जातात. आरोग्य हा मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आजारपणाचा खर्च टाळण्यासाठी लोक आधीच आरोग्य विमा (Health Insurance) घेतात. पण असेही अनेक लोक आहेत ज्यांना हेल्थ इन्शुरन्स घेणे शक्य होत नाही. अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्र सरकार काम करत आहे.

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेत नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरित केले जातात. या अंतर्गत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होतात. या बरोबरच केंद्र सरकार आता सर्व लोकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट म्हणजेच आभा कार्ड (ABHA Card) तयार करत आहे. यासाठी सरकारने कोणतेही निर्बंध ठेवले नाहीत. जर तुम्हाला अजूनही आभा कार्ड मिळाले नसेल तर तुम्ही अगदी घर बसल्या कार्ड काढू शकता. चला तर मग आज याच बाबतीत अधिक माहिती घेऊ या..

ABHA Card कशा प्रकारे बनवाल आभा कार्ड

डिजिटल हेल्थ सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आभा कार्ड तयार करण्यास सुरूवात केली आहे. देशातील कोणताही नागरिक आभा कार्ड बनवू शकतो. जर तुम्हाला आभा कार्ड अजूनही मिळाले नसेल तर तुम्ही घर बसल्या यासाठी अर्ज करू शकता. आभा कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://abha.abdm.gov.in/abha/v3 या वेबसाईटवर जावे लागेल.’

उद्धव ठाकरे चार ते पाच जागी उमेदवार बदलण्याची शक्यता

यानंतर तुम्हाला ‘आभा नंबर तयार करा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधारकार्ड यांपैकी जो पर्याय निवडताल त्या कार्डचा नंबर द्यावा लागेल. यानंतर ‘मी सहमत आहे’ असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर टिक करा. यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. हा नंबर सबमिट केल्यानंतर तुमचे आभा कार्ड तयार झालेले असेल.

ABHA Card आयुष्मान सारखेच आभा कार्ड?

देशात डिजिटल हेल्थ सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. आभा कार्ड द्वारे मोफत उपचार होऊ शकतात का? हे कार्ड आयुष्मान कार्ड प्रमाणेच आहे का? तर नाही. आभा कार्ड पूर्णपणे वेगळे कार्ड आहे. यामध्ये तुमचे मेडिकल रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सेव्ह केले जाते. हे 14 अंकांचे एक युनिक कार्ड आहे. यामध्ये क्यूआर कोडही असतो.

तुम्ही कोणत्या आजारांवर उपचार घेत आहात? तुम्ही कुठे उपचार घेतले आहेत? तुम्ही कोणती औषधे घेत आहात? तुमचा रक्तगट कोणता आहे? तुम्हाला कोणत्या गोष्टीची अलर्जी आहे? ही सर्व माहिती या कार्डमध्ये असते. जर तुम्ही कुठे उपचारासाठी जात असाल तर प्रत्येक वेळी फाईल बरोबर नेण्याची गरज राहत नाही. आभा कार्ड घेऊन तुम्ही दवाखान्यात जाऊ शकता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img