8.3 C
New York

BJP : माजी मुख्यमंत्र्यांना पाडणाऱ्या नेत्याचा भाजपाला रामराम

Published:

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात मोठ्या राजकीय उलथापालथी होताना दिसत आहेत. या राजकीय घडामोडींचं केंद्र नांदेड ठरू (Nanded News) लागलं आहे. जागावाटपात युती अन् आघाडीत अनेक मतदारसंघांची अदलाबदल झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना पक्षांतर करणे भाग पडत आहे. यामध्ये राजकारणातील चर्चित चेहरेही आहेत. भाजप (BJP) खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी नुकताच शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. कारण त्यांचा कुडाळ मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या वाट्याला गेला. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. चिखलीकर आजच अजित पवार यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागावाटपात लोहा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळाला आहे. त्यामुळे आगामी राजकारणाचा वेध घेत प्रताप पाटील चिखलीतकर पक्ष बदल करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. राजकीय तडजोडीपोटी हे पक्षांतर होत असले तरी दिग्गज नेत्याने पक्ष सोडून जाणे भाजपसाठी धक्काच मानला जात आहे.

85 चा फॉर्मुला अंतिम नाही; वडेट्टीवारांचा दावा, काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

नांदेड जिल्ह्यात प्रताप पाटील चिखलीकर मातब्बर नेते म्हणून परिचित आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा भाजपने त्यांना तिकीट देत थेट तत्कालीन काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या विरुद्ध मैदानात उतरवले होते. चिखलीकर यांनी भाजपाचा विश्वास सार्थ ठरवत अशोक चव्हाणांचा तब्बल एक लाखांहू अधिक मतांनी पराभव केला होता.

जिल्ह्यातील लोहा कंधार या मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. चिखलीकर आधी काँग्रेसमध्ये होते. नंतरच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा पक्षबदल त्यांनी केला आहे. आताच्या विधानसभा निवडणुकीत जी राजकीय समीकरणं नव्याने तयार झाली आहेत. ती पाहता त्यांनी भाजप सोडणे भाग पडले आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास चिखलीकर इच्छुक आहेत. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी भाजप सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पक्षप्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून अजित पवार यांच्या उपस्थितीत आजच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी शक्यता आहे. पक्षात प्रवेश घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते किंवा विधानसभेची उमेदवारी दिली जाते याचं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संजय पाटलांच्या हातात घड्याळ

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून रोहित पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असेल याचं उत्तर आता मिळू लागलं आहे. भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता संजय पाटील लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img