महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी याद्या महाविकास (Maharashtra Elecions 2024) आघाडीतील जाहीर झाल्या. त्याआधी महायुतीतील अजित पवार गटाची ३८ जणांची पहिली यादी जाहीर झाली होती. या पहिल्या यादीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं नाव (Dhananjay Munde) होतं. त्यांना पुन्हा परळीतून तिकीट मिळालं. यानंतर काल गुरुवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार मागील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांची संपत्ती तब्बल ३१ कोटी रुपयांनी वाढली आहे.
धनंजय मुंडे आणि त्यांची व कुटुंबाकडे ५३ कोटी ८० लाख रुपयांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांच्या काळात या संपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे. या संपत्तीत जवळपास ३०.७५ कोटी रुपयांची भर पडली आहे. २०१९ मध्ये त्यांच्याकडे २३ कोटींची संपत्ती होती. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
यशोमती ठाकूर पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात
धनंजय मुंडे यांच्या नावावर १५ कोटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांची विविध वाहने आहेत. टँकर ते बुलेट अशा सात वाहनांचा यात समावेश आहे. ७ लाख ३ हजार रुपये किंमतीचे १९० ग्रॅम सोने आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या नावावर ३१ लाख ७८ हजार ६७५ रुपये किंमतीची दोन वाहने आहेत. २२ लाख ९० हजार रुपये किंमतीचे ६२० ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे तसेच ७२ हजार रुपये किंमतीची दीड किलो चांदी आहे.
Dhananjay Munde छगन भुजबळांकडे किती संपत्ती
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) उमेदवारी देण्यात आलीयं. भुजबळ यांना काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यात आलीयं. आयोगाच्या माहितीनुसार छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटी ३२ लाख ६६ हजार २३५ रुपयांची जंगम मालमत्ता असून ११ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.