13.8 C
New York

Sanjay Raut : ठाकरे गटाच्या जागांबाबत राऊत काय म्हणाले?

Published:

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मात्र बुधवारी (23 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली. तसेच म 270 जागांवर हाविकास आघाडीतील सर्व पक्षांची सहमती झाली आहे, बाकी 15 जागांवर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटपात शतक मारणार, असे वक्तव्य बुधवारी (23 ऑक्टोबर) केले होते. याचसंदर्भात त्यांना आज, गुरुवारी (24 ऑक्टोबर) प्रश्न विचारला असता, त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

288 जागा महाविकास आघाडी लढणार आहे. शरद पवार यांनी आम्हाला सांगितली की, 85-85-85 जागांची आपली बोलणी झाली आहे, ती तुम्ही जाहीर करा. उरलेल्या जागांवर मित्रपक्ष किंवा इतर काही ठिकणी चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागावाटपात आता घोळ घालून चालणार नाही. पण शेवटच्या क्षणी सुद्धा काही मतदारसंघामध्ये अदलाबदल होऊ शकते आणि ती होणं गरजेचं असतं. त्यावर सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यामुळे 85-85-85 ची तुमची बेरीज चुकली, यात तुम्ही कशाला जाता. महाराष्ट्रात आम्ही 175 जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे, अशी भूमिका राऊत यांनी स्पष्ट केली.

भाजपाच्या संजय काकांच्या हाती घड्याळ, रोहित पाटलांविरुद्ध लढत ठरली

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना किती जागा सुटू शकतात? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, मित्रपक्ष त्यांच्या भागात जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला जातील, तेव्हा समजेल त्यांना किती जागा सुटल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर राऊतांना विचारण्यात आले की, सांगोला किंवा पारड्यांच्या जागेवर उमेदवार उभा केलेला नाही. या जागेवर चर्चा सुरू आहे. सांगोला आणि पारड्यात शिवसेना ठाकरे गटाचा आमदार निवडून आलेला आहे. त्यामुळे पडद्यामागे चर्चा सुरू असेल. 288 जागासंदर्भात तुम्ही प्रश्न विचाराल तर या ठिकाणी त्यावर कशी चर्चा करणार? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut शतक मारायला 15 पाहिजेत ना?

दरम्यान, संजय राऊत यांनी विचारण्यात आले की, काल तुम्ही जागांचे शतक मारणार असल्याचे वक्तव्य केले होते. पण 85 जागांचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. यावर ते म्हणाले की, अजून काही ओव्हर खेळायच्या शिल्लक आहेत. 85 पर्यंत आम्ही आलो आहोत, शतक मारायला 15 पाहिजेत ना? अजून जवळजवळ 25 ओव्हर खेळायच्या शिल्लक आहेत. 2 षटकार मारले आणि एक चौकार मारला तर शतक होईल. ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. वानखेडेवर कोण कधी शतक मारेल सांगता येत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img