14.2 C
New York

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या यादीत ट्विस्ट, धाराशिवमधील ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलणार

Published:

महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित (MVA Seat Sharing) झाला आहे. आघाडीतील तिन्ही पक्ष ८५ या समान जागांवर उमेदवार देणार आहेत. तर १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याची चर्चा आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आघाडी घेत ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. या उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी यात काही बदलही होऊ शकतात असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यानुसार बदलाचे संकेत मिळाले आहेत. धाराशिव जिल्ह्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांत बदल करणार आहेत.

ठाकरे गटाच्या धाराशिवमधील उमेदवारांत बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात हा बदल होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाने येथून रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना तिकीट दिले आहे. परंतु, याच जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांनी दावा ठोकला आहे. त्यांची दावेदारी मागे होईल याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे जास्त ताणाताणी नको म्हणून ठाकरे येथील उमेदवारी बदलतील. कदाचित राहुल मोटे यांना पक्षात घेऊन त्यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढविली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली, ब्रिगेड जरांगेंना साथ देणार?

राहुल मोटे तीन वेळा आमदार राहिले आहेत. शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्या विरुद्धही त्यांनी लढत दिलेली आहे. यंदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तानाजी सावंत यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने रणजित पाटील यांचं नाव वगळल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीचे अन्य वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते. यावेळी उमेदवारांच्या यादीत बदल होऊ शकतो असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर राहुल मोटे यांची अपेक्षा वाढली आहे. यानंतर आता ठाकरे गट खरंच उमेदवार बदलणार का, राहुल मोटे यांना तिकीट मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img