गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध विमान कंपन्यांना त्यांची विमाने उडवून (Pune Airport) देण्याच्या धमक्या येत आहेत. अशात आता पुणे विमानतळावरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या 11 विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. एअर कंपनीच्या मॅनेजरला एक्सवरून एका नामांकित एअर कंपनीच्या मॅनेजरला ट्विट करत उडवूनन देण्याची धमकी मिळाली आहे.
विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या या कंपनीच्या मॅनेजरला एक मेल आणि एक्स पोस्ट आली असून, यामध्ये या आरोपीने पुण्याहून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत अशी धमकी दिली. या धमकीमुळे विमानतळासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही विमाने दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कलकत्ता यासह वेगवेगळ्या शहरात निघाली होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरीत भाजपकडून शिवाजी कर्डिलेंनी दाखल केला उमेदवारी
Pune Airport डुमना विमानतळालाही धमकी
एका अज्ञात व्यक्तीने मध्य प्रदेशातील जबलपूर येथील डुमना विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती, मात्र तपासादरम्यान ही धमकी खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद कलादगी यांनी पीटीआयला सांगितले की, “कॉलरने विमानतळ अधिकाऱ्यांना सांगितले की, इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे.”
मात्र हा फोन खोटा निघाला. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पो
लिसांचा सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या नऊ दिवसांत 170 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.