13.8 C
New York

Sharad Pawar : “शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद”; अजितदादांच्या आमदारांचं मोठं विधान”

Published:

‘शरद पवारांना (Sharad Pawar) कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. माझी समाजाला गरज आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केलं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाने पुन्हा नरहरी झिरवाळ यांनाच तिकीट दिलं आहे. झिरवाळ सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघावरून महायुतीत चांगलीच रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेला जागा मिळावी यासाठी धनराज महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. उमेदवारी झिरवाळ यांनाच मिळाली. त्यामुळे महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीकडून तिकीटासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढणार? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, या मतदारसंघातून झिरवाळ यांनी अर्ज भरला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. माझी समाजाला गरज आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील’, असे वक्तव्य त्यांनी केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img