विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळं निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये एकूण सहा मोठे पक्ष एकमेकांविरोधात लढत असल्यानं मोठी चुरस असणार आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) महायुतीच्या उमेदवारांसाठी सलग आठ दिवस सभा घेणार आहेत. या सभा राज्यातील विविध भागांमध्ये पार पडणार आहेत. पंतप्रधानांचा परदेश दौराही नियोजित असल्यानं सभांचं काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे.
Narendra Modi कधी आणि कुठे होणार मोदींच्या सभा?
7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधानांच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका असणार आहे. नरेंद्र मोदींच्या विभागवार सभा घेण्यात येणार आहे. फक्त भाजपच नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा होणार आहेत. पंतप्रधान 14 नोव्हेंबरनंतर परदेश दौऱ्यावर असल्यानं सभांना कमी कालावधी मिळणार आहे.
इस्लामपूरमधून शक्तिप्रदर्शन करत जयंत पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
Narendra Modi कुठे होणार संभाव्य सभा?
मुंबईत ३६ विधासभा मतदारसंघ आहेत, त्यामुळं मुंबईत किमान दोन सभा. त्यानंतर पुण्यात ६ विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामुळं इथं एखादी सभा तर ठाणे जिल्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठी देखील पंतप्रधान सभा घेतील. त्यानंतर मराठा आरक्षणामुळं संवेदनशील बनलेला मराठवाडा, त्यानंतर काँग्रेसनं लोकसभेला मुसंडी मारलेल्या विदर्भात आणि कोकणातही मोदींच्या सभा होऊ शकतात.
सभांची प्रत्यक्ष ठिकाणं अद्याप भाजपकडून निश्चित झालेली नाहीत. परंतू वर उल्लेख केलेल्या भागांमध्ये एकापेक्षा अनेक उमेदवारांसाठी एकत्रितपणे या सभा होऊ शकतात.