3 C
New York

Obesity  : बापरे! 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुले लठ्ठपणाच्या आहारी; जाणून घ्या

Published:

आज लठ्ठपणाची समस्या वेगाने (Obesity) वाढत चालली आहे. मोठ्यांप्रमाणेच आता लहान मुलांतही ही समस्या वेगाने वाढू लागली आहे. एखादे मूल जास्त जाड असले तर आपल्याकडे हेल्दी मानले जाते परंतु असे नाही. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा ही समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे आणखीही काही शारीरिक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. सेंटर फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिवेंशननुसार (सीडीसी) मागील दोन दशकांच्या काळात जगभरात लहान मुलांमधील लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. जगभरातील मुलांच्या एकूण लोकसंख्ये पैकी निम्मी मुले लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. ज्यावेळी ही मुले मोठी होतील तोपर्यंत अनेक शारीरिक आजारांनी ग्रस्त झालेली असतील.

सीडीसीनुसार मुलांमधील लठ्ठपणा ही एक चिंताजनक बाब आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचा वाढता दर आरोग्य तज्ज्ञांसाठी आव्हान ठरले आहे. एकट्या अमेरिकेतच 2 ते 19 वयोगटातील जवळपास 14.7 मिलियन लोक लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. आर्थिक आणि सामाजिक मागास असलेल्या कुटुंबासाठी लठ्ठपणाची समस्या जास्त त्रासदायक आहे. अशात कोणत्याही देशाचा आरोग्यावरील खर्च वाढतो. लठ्ठपणा हा आजार म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) घोषित केले आहे. यामुळे अन्य आजारांचा धोका देखील वाढतो.

मी जावई शोधतेय, पण अजून सापडला नाही ; सुप्रिया सुळे

Obesity  मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची कारणे

मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. सध्या वाढत चाललेले अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. मुले बाहेर जाऊन खेळण्यापेक्षा तासनतास मोबाईलवर गेम खेळत राहतात. यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सुद्धा लठ्ठपणा वाढीस लागला आहे. बाहेरचे जंक फुड (Junk Food) आणि अल्ट्रा प्रोसेसड फूड मुले मोठ्या आवडीने खातात. या खाद्य पदार्थांत कॅलरी खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते.

जेनेटिक कारणांमुळे देखील लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. ज्या कुटुंबात आईवडील आधीपासूनच लठ्ठ असतात. त्या घरातील मुले लठ्ठ असतातच. याच कारणामुळे ही समस्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते.

स्ट्रेस आणि तणाव या कारणांमुळे सुद्धा मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होत आहे. अभ्यास, ग्रेड्स अन्य काही कारणांमुळे मुलांमध्ये तणाव वाढत आहे यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे.

Obesity  लठ्ठपणा असा ठरतोय त्रासदायक

लठ्ठपणामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा हाय कोलेस्टेरॉलची (High Cholesterol) समस्या वाढू लागली आहे. याच समस्येमुळे पुढे जाऊन हृदयविकार (Heart Disease) होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आज अगदी कमी वयात हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याची अनेक उदाहरणे दिसत आहे.

लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. या वयात रक्तदाब होण्याचे काहीच कारण नाही मात्र लठ्ठपणामुळे अगदी लहान वयातच ही समस्या निर्माण होत आहे.

लठ्ठपणामुळे टाईप 2 मधुमेहाचा (Diabetes) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. लठ्ठपणामुळे शरीरात इन्सुलिन रेजिस्टंसची समस्या वाढते. यामुळे मधुमेहाचा जन्म होतो. याशिवाय लठ्ठपणामुळे किडनी आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

कसा कंट्रोल कराल लठ्ठपणा

प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमधील लठ्ठपणा लवकर नियंत्रणात आणता येऊ शकतो. यासाठी मुलांकडून जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करवून घ्या. मुलांना मैदानावरील खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. रानिंग, फुटबॉल, क्रिकेट असे खेळ खेळण्यास सांगा.

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. बाहेरील जंक फूड किंवा फास्ट फूड ऐवजी मुलांना घरचा आहार देत चला. तसेच मुलांना त्यांच्या नेहमीच्या आजारापेक्षा जास्तीचे खाणे टाळा.

मुलांचे वजन आणि त्यांची हाईट वेळोवेळी तपासत चला. तसेच बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील घेणे फायदेशीर ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img