14.2 C
New York

Amit Thackeray : उमेदवारीनंतर अमित ठाकरे काय म्हणाले?

Published:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. काल जाहीर झालेल्या उमेदवार यादीत याबद्दलची घोषणा करण्यात आली. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला आहे, अशी प्रतिक्रिया दिली. मला आत्मविश्वास खूप आहे. पण उमेदवार यादीत माझे नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. कारण आता मला समजलं आहे की माझं आयुष्य पूर्णपणे चेंज होणार आहे. साहेबांनी नाव जाहीर केल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला आहे, असे अमित ठाकरे म्हणाले.

राजकारणात जाण्याची माझी इच्छा आहे. परंतु, राज ठाकरे यांच्यावर मी दबाव टाकणार नाही असं ठरवलं होत. मला ज्यावेळी राज ठाकरे यांनी विचारलं की तुला राजकारणात जायचे आहे का? त्यावर मी फक्त तुम्ही दिली संधी तर जाणार. मी तुमच्यावर कोणताही दबाव आणणार नाही असं सांगितलं होत अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. ते विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा पत्रकारांशी बोलत होते.

अजितदादांनी जाहीर केली उमेदवारांची यादी; बाजी मारण्यासाठी 38 शिलेदार मैदानात

उद्धव ठाकरे तुमच्या विरोधात उमेदवार देतील का? असं विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले मला काही फरक पडत नाही. मी प्रामाणिकपणे काण करत राहणार आहे. तसंच, मला विश्वास आहे की मी निवडणूक येणार आहे. आजपर्यंत ठाकरे घराण्यात पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर रिमोट कंट्रोलने सर्व चालवणारे कदाचित राज ठाकरे शेवटे नेते असतील असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी निवडणुकीनंतर तुम्ही कुणासोबत जाणार महायुती की महाविकास आघाडीसोबत जाणार असं विचारल्यावर अमित ठाकरे म्हणाले आमचे 150 येऊ शकत नाहीत का? असं म्हणत आम्हीही बहुमतात येऊ शकतो असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img