14.2 C
New York

Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई HC कडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

Published:

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (Chhota Rajan) मुंबई HC कडून जामीन देण्यात आला आहे. 2001 मध्ये हॉटेलचालक जया शेट्टीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवल्या प्रकरणात राजनला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, कोर्टाने या प्रकरणात छोटा राजनला सुनावण्यात आलेली जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिले आहेत. यापूर्वी विशेष MCOCA न्यायालयाने 30 मे 2024 रोजी राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (Bombay High Court Grants Bail To Gangster Chhota Rajan)

Chhota Rajan कोण होता जया शेट्टी?

जया शेट्टी हे मध्य मुंबईतील गामदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलचा मालक होते. शेट्टी यांना छोटा राजन टोळीकडून खंडणीचे फोन येत होते. मात्र, खंडणी न दिल्याने 4 मे 2001 रोजी त्याच्या हॉटेलमध्ये टोळीच्या दोन सदस्यांनी शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. शेट्टी यांना येणाऱ्या धमक्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांनीही त्यांना सुरक्षा पुरवली होती. मात्र, हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

मी जावई शोधतेय, पण अजून सापडला नाही ; सुप्रिया सुळे

Chhota Rajan जन्मठेपेची शिक्षा

2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राजनवर खंडणीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष MCOCA न्यायालयाने 30 मे 2024 रोजी राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात राजनकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करत छोटा राजनला जामीन मंजूर करत सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img