14.2 C
New York

Supriya Sule : मी जावई शोधतेय, पण अजून सापडला नाही ; सुप्रिया सुळे

Published:

बारामती विधानसभा मतदारसंघात काल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची सभा झाली. सभेत (Sharad Pawar Group Melava) बोलताना सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि लाडक्या बहिण योजनेवर घणाघाती टीका केलीय. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांच्या जावयावर देखील मोठं विधान केलंय. सुळे म्हणाल्या की, मी जावई शोधतेय, पण अजून सापडला नाही. जेव्हा माझा जावई येईल, तेव्हा चौथ्या वर्षी मी आणि सदानंद सोप्यावर जावून बसेल आणि म्हणेल बेटा करो अभी, सासू को गिफ्ट दो! आपली पोरगी कमावतेय, आपला जावई कमवतं आहे. तो पण आपला मुलगा आहे ना, जावई काही बाहेरचा नाही. तो आपलाच मुलगा आहे. सून प्रेमाची. आपण सर्व एक कुटुंब आहोत, मग कशासाठी कुणाचे पाय धुवायचे? असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

बारामतीत (Baramati) काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार आलं तर धोंड्याच्या महिन्यात जावयाचे पाय धुण्याची आपण बारामती मतदारसंघामध्ये बंद करू. या प्रथेऐवजी लेक आणि जावयाने आई-वडील अन् सासू-सासर्‍यांचे पाय धुवायचे अशी प्रथा सुरू करू, असंही सुळे म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोहरादेवी महंतांचा जय महाराष्ट्र

या मेळाव्यात विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, संदीप गुजर, एस. एन. जगताप, सत्यव्रत काळे, वनिता बनकर, आरती शेंडगे, पौर्णिमा तावरे, सतीश खोमणे आणि अशोक इंगुले यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रामध्ये जेव्हा आमचं सरकार येईल, तेव्हा शेतीपूरक प्रत्येक गोष्टीवर लावलेला जीएसटी शून्य करू. अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांनी एकदाही उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राला न्याय मिळणार कसा, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सरकारच्या पैशाने जाहिराती करायच्या नाही, असं विधेयकच अंमलात आणू. यावरील अतिरिक्त खर्च कमी करु. निर्णय घेणाऱ्या लोकांना जाहिरातबाजी करायची गरज नाही. आपलं युद्ध हे राज्यातील लोकांशी नाहीय, तर दिल्लीतील अदृश्य शक्तीसोबत आहे. योग्य वेळ आल्यानंतर राज्यातील जनता त्यांना जागा दाखवून देईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img