महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची (Shivsena) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय बंडात साथ दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित, चंद्रकांत निंबा पाटील, आशिष जैस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे.
Eknath Shinde कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे
साक्री (अज) – मंजूळाताई गावित
चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे
जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील
एरंडोल – अमोल चिमणराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत निंबा पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर
दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ
रामटेक – आशिष जैस्वाल
भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
कळमनुरू – संतोष बांगर
जालना – अर्जुन खोतकर
सिल्लोड – अब्दुल सत्तार
छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल
छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट
‘मविआ’ चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पैठण – विलास भूमरे
वैजापूर – रमेश बोरनारे
नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भुसे
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर
माहिम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत – महेंद्र थोरवे
अलिबाग- महेंद्र हरी दळवी
महाड- भरतशेठ मारुती गोगावले
उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
सांगोला- शहाजी बापू पाटील
कोरेगाव- महेश शिंदे
पाटण- शंभूराज देसाई
दापोली- योगेश कदम
रत्नागिरी- उदय सामंत
राजापूर- किरण सामंत
सावंतवाडी- दीपक केसरकर
राधानगरी- प्रकाश आबिटकर
करवीर- चंद्रदिप नरके
खानापुर- सुहास बाबर
Eknath Shinde एरंडोलमधून अमोल पाटील तर खानापूरमधून सुहास बाबर :
एरंडोलमधून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अमोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा सुहास बाबर यांना तिकीट दिले आहे. राजापूर मतदारसंघातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. चोपडा मतदारसंघातून आमदार लता सोनवणे यांच्या जागी पती आणि माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांना संधी दिली आहे. गतवेळी न्यायालयाच्या निर्णयामुळे चंद्रकांत सोनावणे निवडणूक लढवता आली नव्हती. जोगेश्वरी पूर्वमधून रविंद्र वायकर खासदार झाल्याने त्यांचा पत्नी मनिषा वायकरांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय माजी आमदारांमधून करवीर मतदारसंघातून चंद्रदीप नरके, दर्यापूरमधून अभिजीत अडसूळ आणि जालन्यामधून अर्जुन खोतकर यांना तिकीट दिले आहे.
Eknath Shinde तीन विद्यमान आमदार अद्यापही वेटिंगवरच :
भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे तिघे जण अद्यापही वेटिंगवरतची आहेत. लोकसभेप्रमाणेच याही जागांवरुन वाद असल्याची माहिती असल्याने या आमदारांना वेट अँड वॉचची भूमिका घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे या तिघांना उमेदवारी मिळणार का? की पत्ता कट होणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.