उमेदवारी अर्ज भरायला विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सुरुवात झाली आहे. भाजपाने आपली पहिली यादी रविवारी (20 ऑक्टोबर) जाहीर केल्यानंतर आता हळूहळू सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करू लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (22 ऑक्टोबर) आपल्या 45 शिलेदारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माहीम मतदारसंघाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Thackeray group also challenged Amit Thackeray in Mahim constituency)
शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर आणि मनसेने अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. याचापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार का? राऊत म्हणाले की, वरळी मतदारसंघात मनसेने उमेदवार जाहीर केलेला आहे. मनसे हा एक राजकीय पक्ष आहे. भाजपाला मदत करण्यासाठी समाजवादी पार्टी, वंचित यासारखे पक्ष उमेदवार देतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. अनेकदा वर्षांनवर्षे निवडणूक लढवूनसुद्धा यश प्राप्त होत नाही. असे असतानाही ते पक्ष निवडणूक लढण्याचा थांबत नाही. त्यामुळे त्या पक्षांनी निवडणूक लढू नये, असं आम्ही कधी म्हणणार नाही. जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील, तर तरुणाचं राजकारणामध्ये स्वागत करावं, ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई HC कडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती
संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देण्याबाबत उत्तर न देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना विचारले की, 2019 मध्ये आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून उभे होते. तेव्हा मनसेने त्यांच्याविरोधात उमेदवार न देता अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता अमित ठाकरेंविरोधात तुम्ही उमेदवार देणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, दादर मतदारसंघात शिवसेना कायम लढत आली आहे. दादर, माहीम या मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झालेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही, असं कधी होणार नाही.
Sanjay Raut आदित्य ठाकरे वरळीमध्ये पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने जिंकतील
वरळी मतदारसंघातून मनसेने माघार घेतली तर अमित ठाकरेंना मदत करणार का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, राजकारणामध्ये क्वचित अशा गोष्टी घडत असतात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे गेल्या वर्षी इतक्याच मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्याशिवाय राहणार नाही. वरळीच्या जनतेने आदित्य ठाकरे याचं नेतृत्व आणि काम पाहिलं आहे. लोकांसाठी धावणारा असा हा आमचा तरुण नेता आहे. त्यामुळे आम्हाला वरळीची चिंता वाटत नाही. किंबहुना महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत, जिथे आम्ही खात्रीने जिंकणार आहोत.
Sanjay Raut शिवसेना पक्ष कोणतीही सौदेबाजी करत नाही
दादरमध्ये पाठिंब्याच्या बदल्याच वरळीमध्ये पाठिंबा असं काही गणित आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही कोणताही सौदा करत नाही. कारण शिवसेना हा असा पक्ष आहे, जो कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. राजकारणात निवडणूक लढताना आमचे प्रमुख नेते समोर कोणतंही आव्हान आलं तरी ते आव्हान स्वीकारून निवडणुकीला उभे असतात. त्यामुळे तुमचा प्रश्न चुकीचा आहे, अशी रोखठोक भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
Sanjay Raut निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री नसतील
दरम्यान, शिवसेना शिंदे गट वरळी मतदारसंघातून मोठा उमेदवार देणार असल्याचे समजते. असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, वरळीतून शिंदे गट ट्रम्पला उभं करणार आहेत का? किंवा नरेंद्र मोदी किंवा जय शाहला आणणार आहेत. शिंदेच्या घरामध्ये कोणीही मोठा उमेदवार नाही. ते स्वत: बालबुद्धी आहेत. त्यामुळे या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसतील. त्यांचे मोठेपण हे निवडणुकीचा निकाल लागेल त्याच दिवशी संपणार आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांच्या यादीवर अमित शाह यांचा शिक्का आहे, असा दावाही संजय राऊत केला.