6.2 C
New York

Ajit Pawar : पहिल्या यादीनंतर अजित पवार गटातील अनेक दिग्गज नेते वेटिंगवर

Published:

राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर होत आहेत. भाजपानं सर्वात पहिल्यांदा 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 45 उमेदवारांची यादी त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेनं प्रत्येकी जाहीर केली. भाजपा मनसे आणि शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनही 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीला अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदाच समोरे जात आहेत.

अजित पवारांच्या राजकीय भवितव्यासाठी लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. अजित पवारांनी जाहीर केलेल्या यादीत त्याचं प्रतिबिंब उमटलं आहे. राष्ट्रवादीनं महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ajit Pawar मलिकांना दुहेरी धक्का

नवाब मलिक माजी मंत्री आणि अजित पवारांच्या पक्षातील मुंबईतील महत्त्वाचे नेते यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपाची नवाब मलिकांवरील नाराजी लपलेली नाही. अंडवर्ल्डशी संबंध तसंच मनी लाँड्रींगच्या आरोपामुळे मलिकांना तुरुंगातही जावं लागलंय. आता मलिक जामिनावर बाहेर आहेत.

नवाब मलिक-शेख यांचा परंपरागत मतदारसंघ असेल्या अणुशक्तीनगरमध्ये त्यांची मुलगी सना शेख निवडणूक लढवणार हे जवळपास नक्की झालं होतं. तसंच वातावरण सोशल मीडिया तसंच प्रत्यक्ष मतदारसंघाताही आहे. पण सना मलिक-शेख यांचंही नाव पहिल्या यादीत नाही. त्यामुळे हा दुसरा धक्का नवाब मलिकांसाठी आहे.

Ajit Pawar झिशान सिद्दीकीही वेटिंगवर

वांद्रेपूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वीच हत्या झाली आहे. या हत्येनंतर काही दिवसांमध्येच ही निवडणूक होणार असल्यानं याला एक भावनिक महत्त्व आहे. पण झिशान यांनाही उमेदवारीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Ajit Pawar टिंगरेंना भोवली पोर्शे?

वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणात चांगलंच गाजलं. सुनील टिंगरे यांच्यावर पोर्शे कार चालवणाऱ्या आरोपीच्या जामीनासाठी त्यांनी दबाव टाकल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये टिंगरे यांचाही समावेश नाही. भाजपाचे जगदीश मुळीक या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पोर्शे कार प्रकरणाचा फटका टिंगरेना बसला आहे का? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img