9.8 C
New York

Amit Thackeray : माहीममधून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

Published:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली (Election) यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता आहे. पहिल्या यादीत मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश असणार आहे. सोमवारी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे.

पक्ष निरीक्षकांकडून आलेल्या अहवालावर राज ठाकरे यांनी सोमवारी चर्चा केली. कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची? मनसे उमेदवार ती जागा जिंकू शकतात का? याचा आढवा घेतला आहे. तसंच, अमित ठाकरे यांनी माहीम मतदरसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीत धरला. राज ठाकरे मात्र, अमित ठाकरेंच्या उमेदवारींबाबत निर्णय घेणार आहेत. मनसेच्या पहिल्या यादीमध्ये बाळा नांदगावकर (शिवडी), शालिनी ठाकरे (वर्सोवा), स्नेहल जाधव (वडाळा), बबन महाडिक (कुलाबा), संदीप देशपांडे (वरळी), ललित धुरी (अंधेरी पश्चिम), नयन कदम (मागाठाणे) यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात कोण बाजी मारणार?

अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई नाराज झाल्याची चर्चा सुरू होती. काल झालेल्या बैठकीला नितीन सरदेसाई गैरहजर होते. मात्र, पूर्वकल्पना त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्याची माहिती आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेप्रमाणे मनसेचे मतदार आहेत. 2009 साली मनसेने हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावला होता. तसंच मागील 2014 आणि 2019 साली विधासभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी शिवसेनेच्या सदा सरवणकरांना टफ फाईट दिली होती.

आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वरळीची निवड केली. त्यावेळी राज ठाकरेंनी राजकारणापेक्षा बंधुत्वाला महत्त्व दिलं आणि आदित्य यांच्याविरोधात मनेसनं उमेदवार दिला नाही. विधानसभा जर अमित ठाकरे लढणार असतील तर उद्धव ठाकरे 2019 च्या मदतीची परतफेड करतील का? ठाकरेंची शिवसेना देखील अमित ठाकरेंविरोधात उमेदवार उभा करणार नाही का? या प्रश्नाची जोरदार चर्चा आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img